शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी स्तरावर स्थलांतरीत मजुरांच्या मुलांची माहिती संकलित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 10:43 IST

सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर शासनाकडे पोषण आहारासंदर्भात मागणी नोंदविली जाईल.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गावातून स्थलांतरीत कुटुंबातील बालकांना पोषण आहार मिळण्याचे संकेत असून, त्या दृष्टिकोनातून अंगणवाडी स्तरावर सर्वेक्षण केले जात आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर शासनाकडे पोषण आहारासंदर्भात मागणी नोंदविली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले यांनी ८ मे रोजी दिली.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी व लॉकडाउन आहे. रोजगारानिमित्त अनेक कुटुंब मुंबई, पुणे, नाशिक यासह महानगरात गेले आहे. कोरोना विषाणू संसर्गाचे संकट लक्षात घेता महानगरात कामानिमित्त गेलेले कामगार, मजूर हे आता आपापल्या जिल्ह्यात परतत आहेत. त्या कुटुंबातील बालकांची नावे अंगणवाडी केंद्रात नाहीत. त्यामुळे या बालकांना पोषण आहार मिळणे अशक्य आहे. लॉकडाउनमुळे मजुरांना अगोदरच काम नाही, त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. त्यातच कुटुंबातील बालकांचे कुपोषणही वाढू शकते, ही शक्यता पाहता आता या स्थलांतरीत कुटुंबातील बालकांनाही पोषण आहार मिळण्याचे संकेत असून, त्या दृष्टीने सर्वेक्षण केले जात आहे.

सर्वेक्षण करण्याकामी अंगणवाडी सेविका !प्रत्येक अंगणवाडी स्तरावर दाखल झालेल्या स्थलांतरीत कुटुंबातील बालकांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना असल्याने अंगणवाडी सेविकांवर पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्याची जबाबदारी सोपविली आहे.अंगणवाडी सेविकांकडून बालकांची माहिती गोळा केली जात आहे.वरिष्ठांच्या सुचनेनुसार जिल्ह्यात अंगणवाडी स्तरावर स्थलांतरीत कुटुंबातील बालकांची माहिती संकलित केली जात आहे. ही माहिती संकलित झाल्यानंतर शासनाकडे सादर केली जाईल तसेच पोषण आहारासंदर्भात मागणी नोंदविली जाईल.-नितीन मोहुर्ले,उपमुख्य कार्यकारी अधिकारी

 

 

टॅग्स :washimवाशिम