शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सहकारी जिनिंग-प्रेसिंगला उतरती कळा

By admin | Updated: January 19, 2015 02:34 IST

खासगी जिनिंग भरभराटीस; शासनाचे कापूस धोरण कारणीभूत.

नाना देवळे/ जगदीश राठोड / मंगरुळपीर/ मानोरा:जिल्हय़ातील मंगरुळपीर आणि मानोरा या ठिकाणच्या सहकारी जिनिंग-प्रेसिंगला उतरती कळा लागली असून, जवळपास तीन दशकांपूर्वी भरभराटीस असलेले हे जिनिंग व्यवसाय आज शेवटच्या घटका मोजत आहेत. या उलट खासगी जिनिंग भरभराटीस येत असल्याचे चित्र दिसत असून, खासगी व्यक्ती करू शकते ते सहकारात का होत नाही, असा प्रश्न त्यामुळे निर्माण होत आहे. सहकार क्षेत्रातील जिनिंगला उतरती कळा येण्यास शासनाचे धोरण आणि शेतकर्‍यांची बदलती मानसिकता कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे.मंगरुळपीर येथे शहराच्या बाहेरच्या भागात अकोला मार्गावर ६ सप्टेंबर १९७६ मध्ये १0 एकर जागेवर सहकारी जिनिंग आणि प्रेसिंगची स्थापना झाली, तसेच याच संस्थेकडून तालुक्यातील शेलूबाजार येथे ४ एकर जागेवर जिनिंगची स्थापना करण्यात आली. या सहकारी संस्थेने व्यवसायासाठी जिनिंग आणि प्रेसिंग मशीनरी, इमारत, पाणीपुरवठा, ओटे, गोडाऊन आदींसाठी जवळपास दोन ते अडीच कोटी रुपयांची गुंतवणूक केली. या संस्थेत एकूण एक हजार दोनशे सभासद शेतकर्‍यांनी गुंतवणूक केली असून, त्याचे भाग भांडवल जवळपास १५ लाख रुपयांच्या आसपास आहे. संस्थेला आजपावेतो मिळालेल्या नफ्यातून संस्थेची गुंतवणूक ही बाजारभावानुसार १0 कोटी रुपयांहूनही अधिक असण्याची शक्यता असल्याचे या संदर्भातील माहिती घेतल्यावरून कळले आहे. तथापि, अतिशय चांगल्या पद्धतीने चालत असलेला हा व्यवसाय गत चार वर्षांंपासून बंद पडला आहे. उल्लेखनीय बाब अशी, की मंगरुळपीरच्या सहकारी जिनिंग- प्रेसिंगमध्ये आधुनिक पद्धतीचे १२ डीआर जीन्स आहेत, तसेच आधुनिक पद्धतीचे प्रेसिंग युनिट स्थापण्यास संस्था सक्षम आहे. वाशिम जिल्हय़ातील मानोरा येथे स्व. भीमराव पाटील सहकारी कापूस प्रक्रिया संस्थेने २५ फेब्रुवारी १९७१ ला १३ एकर जागेवर जिनिंगची स्थापना केली. त्याशिवाय या संस्थेने मानोरा तालुक्यातीलच पोहरादेवी येथे पाच एकर जागेत २४ मार्च १९८८ ला पाच जिन्सच्या आधारे जिनिंग सुरू केली होती. संस्थेने व्यवसायासाठी जिनिंग मशीनरी, इमारत, पाणीपुरवठा, ओटे, गोडाऊन आदींसाठी जवळपास दोन ते अडीच कोटी रुपयांची गुंतवणूक केली. हालाखीच्या परिस्थितीत जवळपास ७५६ शेतकर्‍यांनी आपले पैसे शेअर्सच्या माध्यमातून या व्यवसायात गुंतविले. अनेक संकटांचा सामना करीत सहकारी जिनिंग भरभराटीस आणली; मात्र २00७ पासून हा सहकारी जिनिंग व्यवसायही बंद पडला आहे. भीमराव पाटील सहकारी संस्थेने जिनिंगमधील १८ रेचे (जिन्स) जीर्ण झाल्यामुळे प्रत्येकी १८ हजार २00 रुपये किमतीला विकले. त्यामुळे हा जिनिंग व्यवसाय पुन्हा सुरू होण्याची आशा मावळल्यातच जमा आहे.