शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरण; शेतकऱ्यांनो गहू, हरभरा पिकांना जपा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 11:54 IST

Washim Agriculture News ढगाळ वातावरण असल्याने याचा फटका रब्बी हंगामातील तूर, कपाशी, गहू, हरभरा, हळद आदी पिकांना बसत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गत तीन, चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने याचा फटका रब्बी हंगामातील तूर, कपाशी, गहू, हरभरा, हळद आदी पिकांना बसत आहे. यंदा जिल्ह्यात ७२ हजार हेक्टरवर रब्बी पिकाची पेरणी झाली आहे. सर्वाधिक पेरणी ही हरभरा पिकाची ४८ हजार ७९१ हेक्टरवर झाली आहे. त्या खालोखाल गहू पिकाची पेरणी ही २१ हजार ७०२ हेक्टरवर झाली. यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागले. मूग, उडीद व सोयाबीन सोंगणी व काढणीच्या वेळी पाऊस आल्याने उत्पादनात प्रचंड घट आली होती. शेतकऱ्यांची सर्व भिस्त आता रब्बी हंगामातील पिकांवर आहे. गत तीन, चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने हरभरा, हळद, तूर आदी पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव होत  असल्याचे दिसून येते. कीड नियंत्रणासाठी शेतकरी हे विविध प्रकारच्या कीटकनाशकांची फवारणी करण्यात व्यस्त आहेत. विशेषत: हरभरा पिकावर विविध किडींचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. सकाळच्या सुमारास धुके पडत असल्याने याचा फटकाही पिकांना बसण्याची भीती शेतकऱ्यांमधून वर्तविण्यात येत आहे. येत्या दोन दिवसात पाऊस येण्याचा अंदाजविदर्भात येत्या दोन दिवसात पाऊस येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पावसामुळे कपाशीचे नुकसान होऊ नये म्हणून कपाशीची फुटलेले बोंडे त्वरित वेचणी करावी. वांगे, टोमॅटो पिकांचे रोपे ४ ते ६ आठवड्याचे झाले असल्यास स्थलांतरित करावे.

ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्याने कीड नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्या. मार्गदर्शनासाठी कृषी विभाग तत्पर आहे. - एस.एम. तोटावार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती