शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

बंद जि. प. शाळा बनल्या विषारी जिवांचे माहेरघर; प्रांगणास झुडपांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : गेल्या दीड वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बंदच आहेत. आता पावसाळ्याच्या दिवसांत याकडे दुर्लक्ष ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम : गेल्या दीड वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बंदच आहेत. आता पावसाळ्याच्या दिवसांत याकडे दुर्लक्ष झाल्याने जवळपास ९० टक्क्यांहून अधिक शाळांत मोठमोठी झुडपे वाढल्याने या शाळा साप, विंचसारख्या विषारी जिवांचे माहेरघरच बनल्याचे चित्र दिसत आहे.

कोरोना संसर्गामुळे गतवर्षीच्या सत्रापासूनच सर्वच प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद ठेवण्यात आल्या. सद्यस्थितीत आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या असल्या तरी पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा बंदच आहेत. सद्यस्थितीत ऑनलाइन शिक्षणामुळे ५० टक्के शिक्षक या शाळांत उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे ऑनलाइन पद्धतीने धडे देत आहेत. शाळेच्या साफसफाईकडे मात्र कोणीच लक्ष देत नाही. पावसाळ्याच्या दिवसांत शाळेच्या साफसफाईकडे दुर्लक्ष झाल्याने आता जि. प.च्या बंद असलेल्या ९० टक्क्यांहून अधिक शाळांत मोठमोठी झुडपे वाढली असून, या शाळा साप, विंचूसारख्या विषारी जिवांचे माहेरघरच बनल्याचे चित्र दिसत आहे.

---------------

जबाबदारीकडे मुख्याध्यापकांचे दुर्लक्ष

जि. प. शाळांतील सोयीसुविधा व साफसफाई राखण्याची मुख्य जबाबदारी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडेच असते. यासाठी जि. प. शिक्षण विभागाकडून शाळांना निधीही दिला जातो; परंतु शिक्षकांसह मुख्याध्यापकांचेही या जबाबदारीकडे दुर्लक्ष असल्याने आता शाळांना जुनाट, पडक्या, वापरात नसलेल्या इमारतींचे रूप आले आहे.

०००००००००००००००००००

शिक्षकांच्या उपस्थितीवरही प्रश्नचिन्ह सद्य:स्थितीत पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा बंद असून, या शाळांवर कार्यरत एकूण शिक्षकांपैकी ५० टक्के शिक्षकांनाच आळीपाळीने शाळेत येऊन विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षणाचे धडे देण्याचे निर्देश आहेत; परंतु जि. प.च्या शाळा परिसराचे चित्र पाहता शाळेत शिक्षक येतात की नाही, यावरही प्रश्नचिन्ह लागले आहे.

०००००००००००००००००००००००

वर्गखोल्यांतही धूळ, कचरा

जि. प.च्या शाळा बंद असल्याने शाळेच्या साफसफाईकडे दुर्लक्ष होऊन परिसरात झुडपे वाढली आहेतच शिवाय वर्गखोल्यांतही मोठ्या प्रमाणात धूळ, कचरा साचल्याचे चित्र बहुतांश शाळांत पाहायला मिळत आहे. केवळ कार्यालय उघडूनच शिक्षक, मुख्याध्यापक ऑनलािन शिक्षणाचे सोपस्कार पाडत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

------------

कोट: जि. प.च्या शाळांची साफसफाई करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची आहे. शाळा व्यवस्थापन समितीने याकडे लक्ष देऊन साफसफाई करून घ्यायला हवी. शाळांत वाढलेली झुडपे काढून शाळांची तातडीने साफसफाई करण्याचे निर्देश सर्वच मुख्याध्यापकांना दिले जातील.

-गजाननराव डाबेराव,

प्रभारी उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक)

जि. प. वाशिम

-------

जिल्ह्यातील एकूण प्राथमिक जि. प. शाळा-७७५

जि. प. प्राथमिक शाळांवर कार्यरत शिक्षक-३१००

------------

तालुकानिहाय जि. प. प्राथमिक शाळा व शिक्षक

तालुका - शाळा - शिक्षक

कारंजा - १४७ - ५२४

मानोरा - १३२ - ४७३

मंगरूळपीर- ११९ - ४४०

वाशिम - १३७ - ६२१

रिसोड - १०८ - ४७८

मालेगाव - १३२ - ५६४