शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम येथे विविध मागण्यांसाठी लिपिकवर्गीय संघटनेचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 16:23 IST

वाशिम : विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय लिपिकसंवर्गीय हक्क परिषद शाखा वाशिमच्यावतीने २२ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय लिपिकसंवर्गीय हक्क परिषद शाखा वाशिमच्यावतीने २२ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.लिपिक संवर्गीय कर्मचाºयांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन आणि समान पदोन्नतीचे टप्पे करणे, मंत्रालय ते ग्रामपंचायत लिपिकांचे एकसारखे पदनाम करणे, नवीन पेन्शन योजना बंद करून मूळची १९८२ ची जूनी सेवानिवृत्ती योजना लागू करणे व सातव्या वेतन आयोगाचा वर्षाचा फरक रोखीने द्यावा, बक्षी समितीच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाºयांप्रमाणे लिपिकांस आश्वासित प्रगती योजनेचा लाभ १०, २० व ३० या तीन टप्प्यात देण्यात यावा, पदोन्नतीधारक लिपिक संवर्गीय कर्मचाºयास वरिष्ठ पदाचे किमान मूळवेतन मिळण्यासाठी २२ एप्रिल २००९ या अधिसुचनेत सुधारणा करणे, सुधारीत आकृतीबंध लागू करताना लिपिक संवर्गाची पदे बाह्य यंत्रणेमार्फत, कंत्राटी निर्माण न करता ती स्थायी स्वरुपाची निर्माण करण्यात यावी, लिपिकांच्या अर्जित रजा साठविण्याची कमाल मर्यादा काढून टाकण्यात यावी तसेच कॅशलेस वैद्यकीय सुविधा व लिपिकांना नियमित प्रशिक्षण देण्यात यावे अशा प्रमुख मागण्या शासनस्तरावर प्रलंबित आहेत. या मागण्यांच्या पुतर्ततेसाठी यापूर्वी विविध टप्प्यात धरणे, आंदोलने करण्यात आली. मात्र, अद्याप याकडे शासनाचे लक्ष दिले नाही, असा आरोप करीत २२ जानेवारीला संघटनेच्या पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. यावेळी जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश भारती, जिल्हा समन्वयक इश्वर तरडे, कार्याध्यक्ष धनंजय जाधव यांच्यासह व्ही.ए. पालवे, सिद्धार्थ बनसोड, मुकुंद नायक, प्रमोद भगत, नीलेश गाडे, सविता मोरे, पंधारे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाºयांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद