शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ सर्वेक्षणात वाशिम जिल्हा‘ डेंजर झोन’मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 13:28 IST

राज्यात वाशिम जिल्हा ‘डेंजर झोन’ अर्थात सर्वात पिछाडीवर असल्याची बाब जिल्हा परिषद प्रशासनाने गांभिर्याने घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण) कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत तसेच स्वच्छता अ‍ॅपवर प्रतिक्रिया नोंदविण्यात राज्यात वाशिम जिल्हा ‘डेंजर झोन’ अर्थात सर्वात पिछाडीवर असल्याची बाब जिल्हा परिषद प्रशासनाने गांभिर्याने घेतली आहे. स्वच्छता अ‍ॅपवर विभाग प्रमुखांना दहा हजार तर बीडीआेंना २० हजार प्रतिक्रिया नोंदविण्याचे उद्दिष्ट दिले असून, उद्दिष्टपूर्ती न करणाऱ्या अधिकाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.गावात शाश्वत स्वच्छता राखण्यासाठी शौचालयाचा नियमित वापर, सांडपाणी व घनकचºयाचे व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेचा प्रथम टप्पा यशस्वी झाल्यानंतर आता दुसºया टप्प्यातील ‘ओडीएफ’ पडताळणी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. २३ आॅगस्टपासून स्वच्छ सर्वेक्षण -२०१९ (ग्रामीण) अंतर्गत स्वच्छता अ‍ॅपवर अधिकाधिक प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी जनजागृती केली जात आहे. तथापि, या जनजागृतीला अद्यापही वेग नसल्याने ५ सप्टेंबरपर्यंत राज्यात वाशिम जिल्हा सर्वात पिछाडीवर होता. वाशिम जिल्ह्यात ५ सप्टेंबरपर्यंत स्वच्छता अ‍ॅपवर केवळ ३४४ प्रतिक्रिया नोंदविण्यात आल्या.स्वच्छतेसंदर्भात रँक ठरविण्यासाठी केंद्र शासनाचे पथक गावात येऊन तपासणी करणार आहे. तसेच स्वच्छ सर्वेक्षण ग्रामिण २०१९ अंतर्गत मोबाईलवर नागरिकांचा फिडबॅक नोंदविण्याची कार्यवाहीदेखील केली जात आहे. यामध्ये वाशिम जिल्हा माघारल्याची बाब मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी चांगलीच गांभीर्याने घेतली असून, विभाग प्रमुखांसह सर्व गटविकास अधिकाºयांना स्वच्छता अ‍ॅपवर प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी उद्दिष्ट दिले आहे. १५ सप्टेबर २०१९ पर्यंत गटविकास अधिकाºयांना तालुक्यातून किमान २० हजार नागरिकांचे मोबाइलवर अभिप्राय (प्रतिक्रिया) नोंदविण्याचे उद्दिष्ट दिले. तसेच विभाग प्रमुखांना १० हजार नागरिकांचे अभिप्राय नोंदविण्याचे उद्दिष्ट दिले आहे. उद्दिष्टपूर्ती न करणाºया अधिकाºयांविरूद्ध कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषद प्रशासनाने दिला.

स्वच्छता अ‍ॅपवर केवळ ३४४ प्रतिक्रिया !स्वच्छ सर्वेक्षण - २०१९ (ग्रामीण) अंतर्गत राज्यभरात स्वच्छता अ‍ॅपवर प्रतिक्रिया नोंदविण्याची कार्यवाही सुरू आहे. या प्रतिक्रियवर स्वच्छतेची रँक अवलंबून राहणार आहे. राज्यात ५ सप्टेंबर पर्यंत नाशिक जिल्हा प्रथम क्रमांकावर असून, ८१ हजार ६८५ प्रतिक्रिया नोंदविण्यात आल्या. पश्चिम वºहाडातील बुलडाणा जिल्हा १६ व्या क्रमांकावर असून ३५९४ प्रतिक्रिया नोंदविण्यात आल्या. अकोला जिल्हा २३ व्या क्रमांकावर असून, १५४८ प्रतिक्रिया नोंदविण्यात आल्या तर वाशिम जिल्हा सर्वात पिछाडीवर अर्थात ३४ व्या क्रमांकावर असून, केवळ ३४४ प्रतिक्रिया नोंदविण्यात आल्या.

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान