शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
2
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
3
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
4
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
5
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
6
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
7
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
8
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
9
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
10
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
11
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
12
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
13
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
14
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
15
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
16
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
17
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
18
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
19
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
20
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

पोलीस स्टेशन आवारातच दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 01:27 IST

रिसोड: पोलीस स्टेशनला दिलेली तक्रार मागे घे, या कारणाहून  २३ ऑक्टोबर रोजी रिसोड पोलीस स्टेशन आवारात दोन गटात  हाणामारी झाली. दोन्ही गटाने परस्पराविरुद्ध दिलेल्या तक्रारीहून  रिसोड पोलिसांनी दोन्ही गटातील एकूण १४ जणांविरुद्ध विविध  कलमान्वये गुन्हे दाखल केले. यामध्ये एका नगरसेवकाचाही  समावेश आहे.

ठळक मुद्देनगरसेवकाचा समावेश १४ जणांविरुद्ध गुन्हे

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड: पोलीस स्टेशनला दिलेली तक्रार मागे घे, या कारणाहून  २३ ऑक्टोबर रोजी रिसोड पोलीस स्टेशन आवारात दोन गटात  हाणामारी झाली. दोन्ही गटाने परस्पराविरुद्ध दिलेल्या तक्रारीहून  रिसोड पोलिसांनी दोन्ही गटातील एकूण १४ जणांविरुद्ध विविध  कलमान्वये गुन्हे दाखल केले. यामध्ये एका नगरसेवकाचाही  समावेश आहे.रिसोड शहरातील आसनगल्ली परिसरात वास्तव्यास असलेले  जगन्नाथ नेमाडे यांच्या घरासमोर भाउबीजेच्या दिवशी सायंकाळी  पंकज हलगे यांनी फटाके फोडल्यावरून शाब्दिक वाद निर्माण  झाला होता. प्रकरण पोलिसांना तक्रार देण्यापर्यंत गेले होते. त्यातून सदर  घटनेची दखल घेत पोलिसांनी दोन्ही गटातील आरोपींना पोलीस  स्टेशनला बोलविले होते. सोमवार, २३ ऑक्टोबर रोजी दुपारी  १२ वाजता पोलीस स्टेशन आवारात दोन्ही गटातील मंडळी  जमली. यावेळी दोन्ही गटात सुरुवातीला शाब्दिक चकमक उडाली. याचे  रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटातील नागरिकांनी एकमेकांना  मारहाण केली. परस्परविरोधी तक्रारीहून रिसोड पोलिसांनी दोन्ही  गटातील १४ जणांविरुद्ध भादंवि कलम १४३, १४७, १४९,  ३२३, १३५ नुसार गुन्हे दाखल केले. जगन्नाथ o्रावण नेमाडे  यांनी दिलेल्या तक्रारीवरून नगसेवक सागर डांगे, पंकज हलगे,  सोनू हांडे, प्रदीप घायाळ, शंकर पत्तरवाळे, गणेश देशपांडे, सूरज  चिपडे यांच्यावर गुन्हे दाखल केले तर मयूर अशोक हांडे यांनी  दिलेल्या तक्रारीवरून अँड. कृष्णा आसनकर, जगन्नाथ  नेमाडे,  किरण कंडाळे, बजरंग कोकाटे, चैतन्य आसनकर, अशेक  थोरात, हरिष नेमाडे यांच्या विरोधात उपरोक्त कलमान्वये गुन्हे  दाखल केले. घटनेतील अशोक थोरात, सोनू  हांडे, पंकज हलगे या तीन  जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, उर्वरित ११ आरोपी  फरार झाले आहेत. फरार आरोपींचा शोध रिसोड पोलीस घेत  आहेत. सदर घटनेचा तपास ठाणेदार राजेंद्र पाटील यांच्या  मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल संजय आमटे, जनार्धन गिव्हे  करीत आहेत. 

टॅग्स :Crimeगुन्हा