शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रानभाजी महोत्सवाकडे शहरवासियांची पाठ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 18:01 IST

मंगरूळपीरचा अपवाद वगळता उर्वरीत ठिकाणी या महोत्सवाचा फज्जा उडाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरी भागातील नागरिकांना रानभाज्यांचे महत्व पटवून देण्यासाठी ११ आॅगस्टपासून तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाला प्रारंभ झाला खरा; परंतू मंगरूळपीरचा अपवाद वगळता उर्वरीत ठिकाणी या महोत्सवाचा फज्जा उडाला. तांत्रिक कारणामुळे रिसोड येथील महोत्सव लांबणीवर पडला.रानभाज्यांमध्ये विविध प्रकारचे शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक अन्नघटक असतात तसेच या रानभाज्या नैसर्गिकरित्या येत असल्यामुळे त्यावर रासायनिक किटकनाशक, बुरशीनाशकाची फवारणी केली जात नाही, त्यामुळे पूर्णपणे नैसर्गिक असल्याने या संपत्तीचा योग्य वापर आवश्यक आहे. शहरी भागात राहणाºया नागरिकांमध्ये याबाबत जागृती व्हावी, यासाठी जिल्ह्याचे व तालुक्याचे ठिकाणी ‘रानभाजी महोत्सव २०२०’ साजरा करण्याचे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत. त्यानुसार  वाशिमचा अपवाद वगळता उर्वरीत पाच शहरांमध्ये तालुकास्तरावर ११ आॅगस्टपासून या महोत्सवाला प्रारंभ झाला. कोरोना आणि पावसामुळे या महोत्सवाकडे नागरिकांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. मानोरा येथे रानभाजी महोत्सवाकडे शहरवासियांनी पाठ फिरविली. दुपारी दीड वाजेपर्यंतही अधिकारी किंवा पदाधिकारी महोत्सवस्थळी पोहचले नव्हते. बचत गटांनी रानभाजीचे स्टॉल लावले होते. परंतू, त्यांना शहरवासियांची प्रतिक्षा होती. तांत्रिक कारणामुळे रिसोड येथे रानभाजी महोत्सव लांबणीवर पडला. दोन, तीन दिवसात या महोत्सवाचे आयोजन केले जाईल, असे तालुका कृषी अधिकारी काव्यश्री घोलप यांनी सांगितले. कारंजा येथे महोत्सवाचा शुभारंभ होताना, काही नागरिकांची उपस्थिती होती. परंतू, त्यानंतर स्टॉलवर फारसे कुणी नव्हते. मंगरूळपीर येथे महोत्सवाला बºयापैकी प्रतिसाद मिळाला.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडMangrulpirमंगरूळपीर