शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
6
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
8
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
9
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
10
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
11
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
12
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
13
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
15
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
16
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
17
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
18
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
19
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
20
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!

कोरोनाबाबत नागरिकांनी यापुढेही दक्ष राहावे - डॉ. मधुकर राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 5:24 PM

Coronavirus कोरोनाबाबत नागरिकांनी यापुढेही दक्ष राहावे - डॉ. मधुकर राठोड

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम : सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जण दक्षता घेत आहे. आॅक्टोबर महिन्यात कोरोनाचा आलेख घसरत असला तरी मृत्यूसत्र कायम आहे. हिवाळ्याच्या दिवसात कोरोनाचा विषाणू कसा प्रतिसाद देतो, यावर कोरोना विषाणू संसर्गाची तिव्रता अवलंबून आहे. कोरोनाचा धोका अजून टळलेला नसल्यामुळे नागरिकांनी सण, उत्सवादरम्यान व यापुढेही अधिक दक्ष राहावे, असा सल्ला नवनियुक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिला. शनिवारी त्यांच्याशी संवाद साधला असता ते बोलत होते. 

 

खासगी कोविड रुग्णालयाकडून जादा देयकाची आकारणी होते, अशा तक्रारी आहेत, याबाबत काय सांगाल?सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार खासगी कोविड रुग्णालयांनी रुग्णांकडून देयकाची आकारणी करणे आवश्यक आहे. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाºयांनी वाशिम येथे उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. यामध्ये डॉक्टरांचाही समावेश आहे. ही समिती चौकशी करीत आहे. 

जिल्ह्यात आॅक्सिजन प्लांटचा अभाव आहे. याबाबत काय सांगाल?- जिल्ह्यात आॅक्सिजन प्लांटचा अभाव असला तरी आॅक्सिजन मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. आॅक्टोबर महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट येत असल्याने आॅक्सिजन बेडही मोठ्या संख्येने रिकामे आहेत. तथापि, कोरोनाच्या दुसºया लाटेची शक्यता गृहित धरता जिल्ह्यात आॅक्सिजन प्लांट उभारणीबाबत जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मिळणार आहे. इतर जिल्ह्यात यापूर्वी उभारण्यात आलेल्या आॅक्सिजन प्लांटसंदर्भात माहिती घेतली आहे.त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पुढील प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे. लवकरच हा प्रश्न निकाली निघेल, अशी अपेक्षा आहे.

कोरोनासंदर्भात कोणती दक्षता घ्यावी?- आॅक्टोबर महिन्यात कोरोनाचा आलेख घसरत असल्याचे दिसून येते. परंतू धोका अजून टळलेला नाही. कोरोना विषाणू हा हिवाळ्याच्या दिवसात कसा प्रतिसाद येतो, यावर कोरोनाच्या दुसºया लाटेची शक्यता अवलंबून आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि हात वारंवार धुणे या त्रिसूत्रीचा वापर प्रत्येकाने करावा. कोरोना विषाणू संसर्गाला गांभीर्याने घेऊन यापुढेही प्रत्येकाने खबरदारी घेणे हा एकमेव उपाय आहे. केंद्र व राज्य सरकारने अंमलात आणलेल्या उपाययोजनांची वरिष्ठांच्या मार्गदर्शनात आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. 

कोरोनाबरोबरच अन्य साथरोग नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागातर्फे प्रयत्न केले जात आहेत. गेल्या सात महिन्यांपासून आरोग्य अधिकारी व कर्मचारी हे कोरोना नियंत्रणासाठी झटत आहेत. नागरिकांनीदेखील योग्य ती दक्षता घ्यावी.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्याinterviewमुलाखत