शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

अकोला हायवे नजीक बियर शॉपी व देशीविदेशी दारु दुकानास नागरीकांचा तीव्र विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 1:54 PM

वाशीम - अकोला हायवे नजीक असलेल्या वाटाणे वाडी येथे सुरु होत असलेल्या बियर शॉपी व देशी विदेशी दारु दुकानाला परिसरातील नागरीकांनी तीव्र विरोध दर्शविला असून सदर दुकान या भागात सुरु करण्यास परवानगी देण्यात येवू नये यासाठी निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देनागरीकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन तीव्र आंदोलनाचा इशारा

वाशीम - अकोला हायवे नजीक असलेल्या वाटाणे वाडी येथे सुरु होत असलेल्या बियर शॉपी व देशी विदेशी दारु दुकानाला परिसरातील नागरीकांनी तीव्र विरोध दर्शविला असून सदर दुकान या भागात सुरु करण्यास परवानगी देण्यात येवू नये यासाठी निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. नागरीकांच्या भावनांचा विचार न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.

    दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शहरातील प्रभाग क्रमांक एक मध्ये मोडत असलेल्या वाटाणेवाडी या नागरीकांची वस्ती असलेल्या भागात बियर शॉपी व देशी व विदेशी दारु दुकाने सुरु करण्याचा घाट घातला जात आहे. याकरीता राजकुमार चंद्रपाल नागदेव यांच्या प्लॉट क्र. ३५ , सर्वे नं. ३७८, भुभाग क्र. ५७ मध्ये बियर शॉपी व देशी-विदेशी दारु दुकान सुुरु करण्यासाठी हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. प्रभाग क्रमांक एक मध्ये असलेल्या या परिसरात सर्व जातीधर्माचे गोरगरीब नागरीक अनेक वर्षापासून गुण्यागोविंदाने नांदत आहेत. या भागातील कोणत्याही व्यक्तीला व्यसन नाही. तसेच परिसरात जवळच शाळा, दवाखाने, हॉस्पीटल, तीन मंदिरे, कॉलेज आहेत. सदर बियर शॉपी व दारुचे दुकान या भागात सुरु झाल्यास परिसरातील नागरीक या व्यसनाला बळी पडू शकतात. तसेच लहान बालकांवरही याचा मोठा वाईट परिणाम होवू शकते.    परिसरातच शाळा, महाविद्यालये असल्यामुळे दारुचे दुकान सुरु झाल्यास दारुड्या व्यक्तींकडून येणार्‍या जाणार्‍या मुलींची छेड काढण्याचा किंवा विनयभंग करण्याचा प्रकार घडु शकतो. असे झाल्यास येथे एखादा मोठा जातीय वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिसरातील हनुमान मंदिर, गजानन महाराज मंदिर, स्वामी समर्थ महाराज आदी देवतांची तीन मोठी मंदिरे असून त्या अनुषंगाने भाविक भक्त व महिलांची रस्त्यावर मोठी वर्दळ असते. या महिलांना दारुड्या व्यक्तींकडून छेडखानीचा प्रकार घडु शकतो. तसेच दारु दुकान सुरु झाल्यास इतर ठिकाणच्या असामाजीक तत्वांकडून या भागात येवून दारुच्या नशेत वादावादी किंवा चोरी करण्याचे प्रकार घडु शकतात.    सन्माननिय सर्वोच्च न्यायालयाने जनहितार्थ दिलेल्या निर्णयानुसार दारुदुकानच्या नियम व अटींचे याठिकाणी उघडपणे उल्लंघन करुन परवाना काढण्याचे प्रयत्न होत आहेत. तसेच नगर परिषदेकडूनही दारु दुकानाला नाहरकत प्रमाणपत्र देण्याचे प्रयत्न होत आहेत. या दारु दुकानाला परिसरातील नागरीकांचा तीव्र विरोध आहे. अशा परिस्थितीत नागरीकांच्या तीव्र विरोधाचा विचार करुन व लोकहिताचा विचार करुन या ठिकाणी बियर शॉपी व देशी-विदेशी दारु दुकान सुरु करण्याला परवानगी देण्यात येवू नये. निवेदनावर ठोस कारवाई न झाल्यास येथील नागरीक व महिलांच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात इशाराही निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. निवेदनावर निसर्ग युवा मित्रमंडळासह दौलतराव वाटाणे पाटील नगर, स्वामी समर्थनगर, दत्तनगर, भडकेवाडी व प्रभाग एक मधील सर्व नागरीक व महिलांच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, दारुबंदी अधिकारी,  न.प. अध्यक्ष, मुख्याधिकारी व ठाणेदारांना देण्यात आल्या.