शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

सहकाऱ्याच्या गोळीबारात सीआयएसएफ जवान ठार; उधमपूर कॅम्पमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 04:11 IST

गोळीबार करणाराही गंभीर

कारंजा: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएफ) जवानाने केलेल्या गोळीबारात दोघा जवानांचा मृत्यू झाला. त्यात वाशिम जिल्ह्यातील कारंजा गवळीपुरा येथील रहिवासी तस्लीम सलीम मुन्नीवाले या जवानाचा समावेश आहे. दरम्यान, गोळीबार करणाºया जवानाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याची प्रकृती गंभीर आहे.

ही घटना १४ जानेवारीला दुपारी काश्मिरातील उधमपूर सीआयएफच्या जिल्हा मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरावर सुई या गावात घडली. सीआयएफ दलाच्या उधमपूर जिल्ह्यातील सुई या गावामध्ये युनिट क्रमांक २५१ कार्यरत असलेल्या संजय ठाकरे नावाच्या जवानाने मंगळवार १४ जानेवारी रोजी दुपारी त्याच्या सहकारी जवानांवर गोळ्या झाडल्या. त्यात संजय ठाकरे याच्यासह कारंजा येथील रहिवासी कॉन्स्टेबल तस्लिम सलीम मुन्नीवाले तसेच सहकारी कॉन्स्टेबल बी. एन.मूर्ती हे दोघे जखमी जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर बी. एन. मूर्ती आणि तस्लीम मुन्नीवाले यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केले, तर संजय ठाकरे याची प्रकृतीही चिंताजनक आहे. दरम्यान, संजय ठाकरे हा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याची माहिती आहे. तस्लिम सलीम मुन्नीवाले (३४) हा जवान तारापूर सीआयएसएफ मुख्यालयात कार्यरत होता; मात्र तात्पुरत्या स्वरूपात बंदोबस्ताकरिता जम्मू-काश्मीर येथे त्यांच्या युनिटला पाठविण्यात आले होते. तस्लिम हा कारंजा येथील किसनलाल नथमल गोयनका महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. तो २००८ मध्ये सीआयएसएफमध्ये दाखल झाला होता.माझा भाऊ तस्लीम मुन्नीवालेची काश्मिरमधील उधमपूर जिल्ह्याच्या कॅम्पमध्ये तात्पुरत्या स्वरुपात बंदोबस्तासाठी नियुक्ती झाली होती. सहकारी जवानाने गोळ्या घालून त्याची हत्या केल्याची माहिती सीआयएसएफच्या कॅम्पमधून सायंकाळच्या सुमारास मिळाली.-हनीफ मुन्नीवाले, मृत तस्लीम मुन्नीवालेचा भाऊही घटना १४ जानेवारीला दुपारी काश्मिरातील उधमपूर सीआयएफच्या जिल्हा मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरावर सुई या गावात घडली. सीआयएफ दलाच्या उधमपूर जिल्ह्यातील सुई या गावामध्ये युनिट क्रमांक २५१ कार्यरत असलेल्या संजय ठाकरे नावाच्या जवानाने मंगळवार १४ जानेवारी रोजी दुपारी त्याच्या सहकारी जवानांवर गोळ्या झाडल्या.

टॅग्स :Firingगोळीबार