शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जीर्ण झालेल्या पुरातन वेसी कोसळण्याचा धोका बळावला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 15:31 IST

हा ऐतिहासीक ठेवा जपून ठेवण्याकडे मात्र स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून जीर्ण झालेल्या वेसी पावसामुळे कधीही कोसळण्याचा धोका बळावला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राजे वाकाटकांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुर्वीच्या वत्सगुल्म आणि आताच्या वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी परकीय शत्रूंपासून रक्षणाच्या हेतूने टोलेजंग स्वरूपातील वेसी उभारण्यात आल्या होत्या. हा ऐतिहासीक ठेवा जपून ठेवण्याकडे मात्र स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून जीर्ण झालेल्या वेसी पावसामुळे कधीही कोसळण्याचा धोका बळावला आहे.पुर्वीच्या काळात संपूर्ण गाव बंद करण्यासाठी चारही दिशांनी दरवाजे असलेल्या वेसी उभारल्या जायच्या. त्यानुसार, साधारणत: ४०० वर्षांपूर्वी जिल्ह्यातील कारंजा लाड येथे दारव्हा वेस, दिल्ली वेस, पोहा वेस आणि मंगरूळ वेस उभारल्या गेली. तद्वतच वाशिम शहरातही काटीवेस, चंडिका वेस, मंगळवारी वेस आणि माहुरवेस अशा चार वेसी उभारण्यात आल्या होत्या. सदर वेसी नेमक्या कुणी बांधल्या, याची सुस्पष्ट माहिती कुणालाही नाही; परंतु परकीय शत्रूंपासून गावांचे रक्षण व्हावे, या हेतूने त्या सुमारे ४०० वर्षांपूर्वी बांधल्या गेल्या असे जुणे जाणकार सांगतात. कारंजा येथील मंगरूळ वेसीच्या डागडुजीचे काम गतवर्षी नगर परिषदेकडून करण्यात आले; परंतु उर्वरित तीन वेसींच्या डागडुजीचा प्रश्न प्रलंबित असून त्यातील दारव्हा आणि दिल्ली या वेसी कोसळण्याच्या अवस्थेत पोहचल्या आहेत. वाशिम येथील तीन वेसी नामशेष झाल्या असून माहुरवेसची पडझड झाली आहे.जीर्ण वेसींखालूनच होतेय वाहतूकपुर्वी कारंजा आणि वाशिम ही दोन्ही शहरे वेसींच्या आत वसलेली होती. कालांतराने मात्र दोन्ही शहरे वेसींच्या बाहेर दुरपर्यंत विस्तारत गेली. दरम्यान, वाशिममध्ये आपले अस्तित्व टिकवून असलेल्या एकमेव माहुरवेस परिसरात घरे वसलेली असून कारंजा येथे असलेल्या चारही वेसींखालून दैनंदिन वाहतूक सुरू असते. अशा स्थितीत जीर्णावस्थेतील वेसी कोसळल्यास मोठा अपघात घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.कारंजा लाड येथे असलेल्या चारही वेसींच्या पुनरूज्जीवनाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी नगर परिषदेने सर्वंकष प्रयत्न चालविले आहेत. त्यानुषंगाने गतवर्षी १.२२ कोटी रुपये खर्चून दिल्ली वेसीचे पुनरूज्जीवन करण्यात आले; तर १.७६ कोटी रुपये मंजूर असलेल्या दारव्हा वेसीचे काम सुरू आहे. उर्वरित दोन वेसींच्या पुनरूज्जीवनाचा प्रश्नही लवकरच निकाली काढला जाईल.- डॉ. अजय कुरवाडेमुख्याधिकारी, नगर परिषद, कारंजा

वाशिम शहरातील पुरातन माहुरवेस पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. त्यामुळे नगर परिषदेकडून डागडूजी करण्यापूर्वी त्यास मंजूरी मिळण्यासंदर्भातील प्रस्ताव पुरातत्व विभागाकडे पाठविलेला आहे. प्रस्तावाला अद्यापपर्यंत मंजूरी मिळाली नसल्याने हा प्रश्न प्रलंबित आहे.- वसंत इंगोलेमुख्याधिकारी, नगर परिषद, वाशिम

टॅग्स :washimवाशिमhistoryइतिहास