वाशिम : औरंगाबादचे एडतकर दाम्पत्य दिवाळी सन साजरा करण्यासाठी २४ ऑक्टोबर रोजी दुपारी १:३0 वाजताच्या सुमारास पुसदकडे जात असताना पिंपळगाव (डाक बंगला) गावानजीक त्यांच्या कारने ६ वर्षीय दुर्गा दत्तराव कुरुमवाड या चिमुकलीला जबरदस्त धडक दिली. या धडकेत तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मूळचे पुसद येथील एडतकर औरंगाबाद येथील एका खासगी कंपनीत नोकरी करतात. ते एम.एच. २0 सीएच ४७0 क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारने जात होते. मुख्य रस्ता ओलांडत असताना दुर्गाला धडक बसली.
भरधाव कारने चिमुरडीस चिरडले
By admin | Updated: October 25, 2014 00:15 IST