शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

रखरखत्या उन्हात चिमुकले लावत आहेत तलावाच्या पुनरुज्जीवनाला हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 16:57 IST

सुट्याचा आनंद उपभोगण्याऐवजी ते रखरखत्या उन्हात श्रमदान करून गावातील तलावाच्या पुनरुज्जीवनाला हातभार लावत आहेत. 

ठळक मुद्देग्रामचेतना मंडळाने गावालगतच्या गावतलावाचे पुनरुज्जीवन करण्याची संकल्पना मांडली. शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचेही समर्थन मिळाले आणि सर्वांनी तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी श्रमदान केले. वडिलधारी मंडळी गावाच्या भल्यासाठी झटत असल्याचे पाहून गाातील चिमुकली मुलेही यासाठी सरसावली.

इंझोरी: शाळेचे शैक्षणिक सत्र संपले असून, सुट्यांचा काळ सुरू झाला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत सुट्याचा आनंद घेण्यासाठी चिमुकले आजोळी जातात; परंतु इंझोरीतील चिमुकली मुले याला यंदा अपवाद ठरली असून, सुट्याचा आनंद उपभोगण्याऐवजी ते रखरखत्या उन्हात श्रमदान करून गावातील तलावाच्या पुनरुज्जीवनाला हातभार लावत आहेत. गावातील ग्रामचेतना मंडळाच्या पुढाकारातून होत असलेल्या गावतलावाच्या पुनरुज्जीवनासाठी गावकरी झटत असतानाच आता या वडिलधाऱ्या  मंडळीसोबत गावातील चिमुकली मुले, मुलीही यात सहभागी झाले आहेत. रखरखत्या उन्हात तलावाच्या पुनरुज्जीवनासाठीही मुले श्रमदान करीत आहेत. इंझोरीतील पाणीटंचाईवर कायम मात करण्यासाठी गावातील ग्रामचेतना मंडळाने गावालगतच्या गावतलावाचे पुनरुज्जीवन करण्याची संकल्पना मांडली. या संकल्पनेला गावकऱ्यासह गावातील शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचेही समर्थन मिळाले आणि सर्वांनी तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी श्रमदान केले. वडिलधारी मंडळी गावाच्या भल्यासाठी झटत असल्याचे पाहून गाातील चिमुकली मुलेही यासाठी सरसावली. सुट्याचा आनंद घेण्यासाठी आजोळी जाऊन तेथे दिवसभर बागडायचे, आजी, आजोबा, मामा, मामी, मावशी आणि त्यांच्या मुलांशी गप्पा मारायच्या आंब्याची चव चाखायची, असे विचार सुट्याच्या दिवसांत चिमुकल्यांच्या मनात घोळत असतात; परंतु इंझोरीतील या चिमुकल्यांनी. यंदा वेगळाच आदर्श निर्मा केला आहे. खेळण्या बागडण्याच्या वयात ही चिमुकली रखरखत्या उन्हात तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी झालेल्या खोदकामातील माती ते टोपल्यांत भरून तलावाच्या कडेला टाकत आहेत. अवघ्या ७ ते १० वर्षे वयोगटातील या चिमुकल्यांचे प्रयत्न जलसंधारणाच्या कामासाठी श्रमदान करण्यास टाळाटाळ करणाºया लोकांसाठी आदर्श ठरावे असेच आहेत.  गावातील दोन तीन नव्हे, तर चक्क १४ ते २० मुले येथे श्रमदान करतानाचे चित्र दरदिवशी पाहायला मिळते. हे काम आमचेही आहे !  इंझोरीतील गावतलावाचे खोलीकरण करताना गावकऱ्यांनी या तलावाचे नाव रामतलाव असे ठेवले आहे. या तलावाच्या खोलीकरणासाठी संपूर्ण गाव झपाटून गेले आहे. टोपले, फावडे, कुदाळ घेऊन जो, तो येथे श्रमदान करण्यासाठी येत आहे. एवढेच काय, तर गावातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनीही या तलावासाठी श्रमदान केले आहे. हे सर्व पाहूनच आम्हीही या श्रमदानात सहभाग घेतला असून, हे काम आमचेही आहे, असे ही चिमुकली मुले सर्वांना सांगत श्रमदान करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा