शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी केंद्रातील बालकांची होणार पटपडताळणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 13:17 IST

अंगणवाडी केंद्रांत प्रवेश घेतलेले बालक नियमित येते की नाही, प्रत्यक्षात ८८ हजार ६८८ बालकं आहेत की नाही यासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनातर्फे पटपडताळणी केली जाणार आहे. 

ठळक मुद्देजिल्ह्यात १०७६ अंगणवाडी केंद्र असून, यामध्ये ८८ हजार ६८८ बालकांची नोंदणी झालेली आहे.अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिकांना पटपडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात १०७६ अंगणवाडी केंद्र असून, यामध्ये ८८ हजार ६८८ बालकांना पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. अंगणवाडी केंद्रांत प्रवेश घेतलेले बालक नियमित येते की नाही, प्रत्यक्षात ८८ हजार ६८८ बालकं आहेत की नाही यासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनातर्फे पटपडताळणी केली जाणार आहे. ० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांच्या पोषण व आरोग्य विषयक स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणे, बालकांच्या योग्य शारीरीक, मानसिक व सामाजिक विकासाचा पाया घालणे, अर्भक मृत्यू, बालमत्यू, कुपोषण व शाळा गळतीच्या प्रमाणात घट करणे, बाल विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध विभागांमध्ये धोरण निश्चिती आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी करणेसाठी प्रभावी समन्वय कायम ठेवणे, योग्य पोषण आहार व आरोग्य शिक्षण याद्वारे बालकांचे सामान्य आरोग्य व पोषणासंबंधी काळजी घेण्यासाठी मातांना सक्षम बनविणे आदी उद्देशातून अंगणवाडी केंद्रांची स्थापना करण्यात आली. जिल्ह्यात १०७६ अंगणवाडी केंद्र असून, यामध्ये ८८ हजार ६८८ बालकांची नोंदणी झालेली आहे. या बालकांना पूरक पोषण आहार पुरविणे, आरोग्य तपासणी, लसीकरण, संदर्भ सेवा देण्याबरोबरच अनौपचारिक पूर्व प्राथमिक शिक्षण दिले जाते. अंगणवाडी केंद्रात नोंदणी झालेली सर्व बालके नियमित येतात की नाही, प्रत्यक्षात ८८ हजार ६८८ बालकं आहेत की नाही, याची खातरजमा करण्यासाठी पटपडताळणी करण्यात येणार आहे. गर्भवती व स्तनदा मातांना पुरक पोषण आहार व आरोग्य सेवा पुरविली जाते. ११ ते १८ वर्षे वयोगटातील पात्र किशोरवयीन मुलींनादेखील पोषण व आरोग्य शिक्षण, अनौपचारिक शिक्षण व पूरक पोषण आहार पुरविला जातो. अंगणवाडी केंद्रातील पात्र लाभार्थींपर्यंत शासकीय योजना पोहचविणे आणि बोगस लाभार्थींना आळा घालण्यासाठी पटपडताळणी केली जाणार आहे. अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिकांना पटपडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून खात्री केल्यानंतरच शासकीय योजनांचा लाभ दिला जाणार आहे.

अंगणवाडी केंद्रांतील बालकांची पटपडताळणी करण्याच्या सूचना अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, बालविकास प्रकल्प अधिकाºयांना दिलेल्या आहेत. शासकीय योजना पात्र लाभार्थींपर्यंत पोहचविणे, पोषण आहार वाटप प्रक्रियेत सुसूत्रता आणणे यासाठी पटपडताळणी केली जाणार आहे.- दीपक कुमार मीनामुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम.

टॅग्स :washimवाशिमStudentविद्यार्थी