शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पतंग उडविताना विहिरीत पडून बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 11:55 IST

ओम रवींद्र काकरवाल (वय १०) रा शहापूर असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : पंतग उडविण्यास गेलेल्या चिमुकल्या मुलाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना शहरातील बायपास रोडलगत शनिवार, १८ जानेवारी रोजीे दुपारी १२ वाजताच्या दरम्यान घडली. ओम रवींद्र काकरवाल (वय १०) रा शहापूर असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेने काकरवाल कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.मिळालेल्या माहितीनुसार ओम ने घरी खेळाला जातो म्हणून सांगितले आणि मित्रांसमवेत जवळच असलेल्या खरेदीविक्री संघाच्या मोकळ्या जागेवर तो पतंग उडविण्यासाठी गेला. पतंग उडवण्यात तो मित्रांसमवेत दंग झाला. पतंग पकडण्यासाठी धावत असताना ओम खरेदी विक्री संघाच्या मोकळ्या जागेवरील विहिरीत पाय घसरून पडला असावा असा कयास लावण्यात येत आहे. विहिरीत पाणी असल्याने ओम पाण्यात बुडाला. सोबतच्या मित्रांनी आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूचे नागरिक तेथे जमा झाले. नागरिकांनी या घटनेची माहिती मंगरूळपिर पोलिस आणि मंगरूळपिर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला दिली. मात्र तोपर्यंत बराच वेळ निघून गेला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगदाळे सहायक पोलीस निरीक्षक तुषार जाधव, आजीनाथ मोरे, व पोलीस कर्मचारी यांच्यासह अग्निशमन दलाच्या पथकाने व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत विहिरीत शोध घेतला, परंतू ओम सापडला नाही . नंतर पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाने सुद्धा जवळपास तीन ते चार तास शर्तीचे प्रयत्न केले परंतु तरीही ओम सापडला नाही . सदर विहिरीत प्रचंड प्रमाणात कचरा व गाळ असल्याने शोध कार्यात खूप बाधा येत होती, शेवटी स्वामी समर्थ इजिनिअर्सचे कामगार यांनी संध्याकाळी ७ वाजता रेस्कीव्ह आॅपरेशन ला पोकल्यालँड द्वारे सुरुवात केली होती. या वेळी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. संध्याकाळी ८.३० वाजता वृत्त लिहेपर्यंत ओमचा मृतदेह सापडला नव्हताओमच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी मंगरूळपिर चे तहसीलदार किशोर बागडे,नगर परिषद चे मुख्यधीकारी मिलिंद दारोकार,पोलीस उपविभागीय अधिकारी यशवंत केडगे,ठाणेदार धंनजय जगदाळे व पोलीस कर्मचारी तळ ठोकून होते.

टॅग्स :washimवाशिम