शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांनी पोहरादेवीत घेतली रामराव महाराजांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 18:01 IST

बंजारा समाजात पसरलेली नाराजी दुर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची आजची भेट असल्याची चर्चा आहे. 

मानोरा (वाशिम) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, १४ आॅक्टोबर रोजी बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या  पोहरादेवी येथे जाऊन संत रामराव महाराजांची भेट घेतली. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी मानोरा येथील सभेपूर्वी पोहरादेवीला गेल्यानंतरही रामराव महाराजांची भेट न घेतल्याने बंजारा समाजात पसरलेली नाराजी दुर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची आजची भेट असल्याची चर्चा आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची शुक्रवारी मानोरा येथे प्रचारसभा झाली. त्याच्या दुसºयाच दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाशिममध्ये सभा घेतली. दरम्यान, गृहमंत्री शाह हे पोहरादेवीत जाऊनही वेळेअभावी त्यांची रामराव महाराजांशी भेट होऊ शकली नाही. त्यामुळे बंजारा समाजात नाराजी व्यक्त झाली.  ती दुर करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्ररित्या सोमवारी पोहरादेवीचा दौरा करून रामराव महाराजांची भेट घेवून आशिर्वाद घेतला. यवतमाळ जिल्ह्यातील   दिग्रस  येथे प्रचारसभेसाठी आलेले मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोहरादेवीत येऊन रामराव महाराजांचे दर्शन घेतले. त्यांची व रामराव महाराजांची पदीर्घ चचार्ही झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जगदंबा देवी व संत सेवालाल महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी कारंजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी, माजी आमदार अनंतकुमार पाटील, बाबुसिंग महाराज, संजय महाराज, भक्तराज महाराज, बलदेव महाराज आदिंची उपस्थिती होती. जगदंबा देवी संस्थानच्या वतीने याप्रसंगी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसwashimवाशिमMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019