शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात असणार केमोथेरपीची सुविधा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 3:37 PM

वाशिम जिल्ह्यातील कर्करोगग्रस्त रुग्णांना मोठा आधार मिळणार असून, त्यांचा इतर जिल्ह्यात खर्च करून उपचारासाठी जाण्याचा त्रास दूर होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यशासनाने वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात केमोथेरपी युनिटकरीता आवश्यक असलेल्या उपकरणांची खरेदी करण्यासाठी  सहसंचालक, आरोग्य सेवा (असंसर्गजन्य रोग), मुंबई यांच्या प्रस्तावानुसार ३ लाख ४० हजार ३३५ रुपये खर्चास मान्यता दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कर्करोगग्रस्त रुग्णांना उपचारासाठी मोठा आधार होणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत सन २०१९-२० या आर्थिक वर्षातील मंजूर कृती आराखडयामध्ये कर्करोग, मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि स्ट्रोकच्या प्रतिबंध आणि नियंत्रण (एनपीसीडीसीएस) या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत ६५ लाख रुपये अनुदान मंजूर झाले आहे. या अनुदानातून राज्यातील २१ जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी युनिटसाठी लागणाºया उपकरणांची खरेदी करण्याकरीता अंदाजित ६४.९७ लाख रुपये खर्चाच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबतचा प्रस्ताव सहसंचालक, आरोग्य सेवा (असंंसर्गजन्य रोग), मुंबई यांनी शासनास सादर केला आहे. सदर खरेदी प्रस्तावास आयुक्त (आरोग्य सेवा) तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांनी मान्यता दिलेली आहे.  या २१ जिल्हा सामान्य रुग्णालयात वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयाचाही समावेश असून, शासन निर्णयानुसार वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात केमोथेरपी युनिसाठी सायटोटॉक्सिक कॅबिनेटसाठी २ लाख ६२ हजार ३३५ रुपये, तर इन्फ्युजन पंपसाठी ३० हजार आणि पल्स आॅक्सीमीटरसाठी १८ हजार रुपये, असे एकूण ३ लाख ४० हजार ३३५ रुपये खर्चास मंजूरी मिळाली आहे. आता प्रत्यक्षात हा निधी होण्यासाठी सदर उपकरणांची आवश्यक, मागणी यांची शहानिशा किंवा खातरजमा केली जाणार आहे. त्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करून केमोथेरपी युनिट स्थापित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे वाशिम जिल्ह्यातील कर्करोगग्रस्त रुग्णांना मोठा आधार मिळणार असून, त्यांचा इतर जिल्ह्यात खर्च करून उपचारासाठी जाण्याचा त्रास दूर होणार आहे.

टॅग्स :washimवाशिमhospitalहॉस्पिटल