शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी रासायनिक खतांची पूर्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 18:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क  वाशिम : रब्बी हंगामातील पिकांना विविध स्वरूपातील रासायनिक खतांची मात्रा देणे गरजेचे ठरत असताना जिल्ह्यात रासायनिक ...

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : रब्बी हंगामातील पिकांना विविध स्वरूपातील रासायनिक खतांची मात्रा देणे गरजेचे ठरत असताना जिल्ह्यात रासायनिक खतांचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकºयांची पंचाईत झाली होती. त्यातच गत महिनाभरापासून जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांमध्ये युरिया खताचा दाणाही उपलब्ध नसल्याने गहू, हरभरा ही पिके संकटात सापडली होती. या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर जिल्ह्यात २७ डिसेंबर रोजी २४०० मेट्रिक टन युरिया खत उपलब्ध करण्यात आले आहे. जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढले आहे. सुरुवातीला गहू पिकाची पेरणी घटण्याची शक्यता वर्तविली जात होती; परंतु भारनियमनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर या पिकाचे क्षेत्रही वाढले असून, सद्यस्थितीत जवळपास २४ हजार हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली असून, हे पीक आता जोम धरू पाहत आहे. त्याशिवाय हरभरा, मका, रब्बी ज्वारीसह इतर पिकेही तरारली असल्याने या पिकांना खतांची मात्रा देणे आवश्यक झाले होते; परंतु जिल्ह्यात खतांची मागणी वाढत असतानाही तुटवडा निर्माण झाला होता. प्रत्यक्षात यंदाच्या रब्बी हंगामासाठी कृषी विभागाने २७ हजार ३०० मेट्रिक टन खतांची मागणी नोंदविली होती. सुरुवातीच्या काळात शेतकºयांकडून खतांची मागणी फारशी होत नव्हती; परंतु बदलल्या वातावरणानंतर खतांची मागणी वाढली असतानाच जिल्ह्यात खंताचा तुटवडा निर्माण झाला. इतर रासायनिक खते काही प्रमाणात उपलब्ध असली तरी, जिल्ह्यातील चारशेहून अधिक कृषीसेवा केंद्रांपैकी एकाही कृषी सेवा केंद्रावर युरियाचा दाणाही शिल्लक मिळणे कठीण झाले होते. शेतकºयांची ही समस्या लोकमतने वृत्ताच्या माध्यमातून उजागर केली. त्याची दखल कृषी विभागाने घेऊन जिल्ह्यात २४०० मेट्रिक टन युरिया उपलब्ध केला आहे. त्यामुळे आता  पिकांना खत देणे शक्य होणार आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती