शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रेशनच्या तांदळात होतेय रासायनिक खताची भेसळ : मानोरा तालुक्यातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 19:41 IST

इंझोरी : गोरगरीब जनतेला सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत वितरित करण्यात येत असलेल्या तांदळात चक्क रासायनिक खताची भेसळ करण्यात आली आहे. मानोरा तहसील अंतर्गत येणा-या  इंझोरी येथील स्वस्तधान्य दुकानात हा प्रकार उघडकीस आला असून, यामुळे गोरगरीब जनतेच्या जिवाशी खेळ करण्यात येत असल्याचे त्यावरून स्पष्ट होत आहे. 

ठळक मुद्देजनतेच्या जिवाशी यंत्रणेचा खेळ 

नरेश आसावा / लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी : गोरगरीब जनतेला सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत वितरित करण्यात येत असलेल्या तांदळात चक्क रासायनिक खताची भेसळ करण्यात आली आहे. मानोरा तहसील अंतर्गत येणा-या  इंझोरी येथील स्वस्तधान्य दुकानात हा प्रकार उघडकीस आला असून, यामुळे गोरगरीब जनतेच्या जिवाशी खेळ करण्यात येत असल्याचे त्यावरून स्पष्ट होत आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत स्वस्तधान्य दुकानातून पिवळ्या, पांढ-या आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्याचे स्वस्तदराने वितरण करण्यात येते. लाखो गोरगरीबांच्या उदरभरणाचा प्रश्न या प्रणालीमुळे ब-याच प्रमाणात सुटतो. तिन्ही शिधापत्रिकांवर धान्य वितरणाचे प्रमाण वेगवेगळे आहे. या प्रणालींतर्गत इंझोरी येथेही लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करण्यासाठी स्वस्तधान्य दुकान आहे. गावातील जवळपास ९५ टक्के कुटूंब या स्वस्तधान्य दुकानातून शिधापित्रकांवर प्रमाणानुसार धान्य घेतात. या अंतर्गत सध्या स्वस्तधान्य दुकानातून गहू आणि तांदळाचे वितरण करण्यात येत आहे. आधीच स्वस्तधान्य दुकानातून मिळणारे धान्य फारसे दर्जेदार नसताना आता त्यात रासायनिक  खताची भेसळही करण्यात आली असल्याचे इंझोरी येथील स्वस्तधान्य दुकानदाराला पुरवठा विभागाकडून मिळालेल्या धान्यावरून स्पष्ट झाले आहे. या दुकानातून गत महिन्यापासून रासायनिक खताची भेसळ असलेल्या तांदळाचे वाटप होत आहे. 

माझ्या स्वस्तधान्य दुकानातून वितरीत करण्यात आलेल्या तांदळात रासायनिक खतांचे दाणे असल्याचे शिधापत्रिकाधारकांनीच सांगितले. सुरुवातीला आपल्यालाही हे कळले नव्हते. ग्राहकांच्या तक्रारीनंतर आपण सर्वांसमोर नवे पोते उघडून दाखवित ही आपली चूक नसल्याचे स्पष्ट केले. आम्हाला प्राप्त झालेल्या तांदळाच्या पोत्यांतच ही भेसळ आहे. - मनोज जयस्वाल स्वस्तधान्य दुकानदार, इंझोरी ता. मानोरा

स्वस्तधान्य दुकानातील तांदळात रासायनिक खतांची भेसळ असल्याचे आम्हाला दिसून आले आहे. हा ग्रामस्थांच्या जिवाशी खेळ असून, आम्ही स्वस्तधान्य दुकानातील पुरवठा तात्काळ बंद करण्याच्या सूचना स्वस्तधान्य दुकादाराला दिल्यात. या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई आवश्यक आहे. - विनादेवी जयस्वाल, सरपंच, इंझोरी 

टॅग्स :washimवाशिम