शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा दोन कोटी गौण खनिज महसूल वसुलीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 17:45 IST

आतापर्यंत २५ कोटींपैकी २२.८२ कोटी रुपयांचे महसूल उद्दिष्ट गाठले आहे. 

वाशिम : सन २०१९-२० या आर्थिक वर्षात गौण खनिज वसुलीतून २५ कोटी रुपयांच्या महसूलाचे उद्दिष्ट असून, २९ फेब्रुवारीपर्यंत २२.८३ कोटी रुपयांची वसूली झाली आहे. ३० दिवसांत सव्वा दोन कोटी रुपये महसूल वसूल करण्याचे आव्हान खनिकर्म विभागाला पेलावे लागणार आहे.शासनाची कोणतीही परवानगी न घेता चोरट्या मार्गाने रेती, मुरूम, गिट्टी आदी गौण खनिजाची वाहतुक केली जाते. गौण खनिजप्रकरणी जिल्हा प्रशासनाला महसुल वसुलीचे उद्दिष्ट दिले जाते. सन २०१९-२० या आर्थिक वर्षात जिल्हा प्रशासनाला शासनाकडून २५ कोटी रुपयांचे महसूल उद्दिष्ट मिळाले आहे. गतवर्षीप्रमाणेच यंदा महसूल वसुलीचे उद्दिष्ट तेवढेच आहे. गौण खनिज वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी जिल्हास्तर तसेच तालुकास्तरावर महसूल विभागातर्फे पथक गठीत केले जाते. या पथकाने आतापर्यंत २५ कोटींपैकी २२.८२ कोटी रुपयांचे महसूल उद्दिष्ट गाठले आहे. जिल्ह्यात काही प्रमाणात निसर्गसंपदा असल्याने गौणखनिज साठा उपलब्ध आहे. त्यात वाळू, मुरुम, माती यांचा समावेश आहे. मात्र, रेतीघाट लिलावाला अद्यापपर्यंत हिरवा कंदील मिळाला नसल्याने लिलाव होऊ शकले नाहीत. चोरट्या मार्गाने वाळूची वाहतुक केली जाते. याविरूद्ध प्रशासनाची कारवाईची मोहिम सुरू आहे. ३० दिवसांत सव्वा दोन कोटी रुपयांचा महसूल वसुल करण्याचे आव्हान खनिकर्म विभागाला पेलावे लागणार आहे.  मालेगाव तालुका माघारलामालेगाव तालुक्याला ४.५० कोटींचे उद्दिष्ट मिळाले आहे. फेब्रुवारीअखेर केवळ ३८ लाखांचा महसूल वसुल झाला आहे. ३० दिवसांत जवळपास ४ कोटींचा महसूल वसुल करण्याचे आव्हान मालेगाव तहसिल कार्यालयाला पेलावे लागणार आहे. दुसरीकडे वाशिम तहसिल प्रशासनाने जिल्ह्यात सर्वाधिक उद्दिष्ट गाठले आहे. वाशिम तहसिल कार्यालयाला ५.५० कोटींचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ४.९३ कोटींचे उद्दिष्टपूर्ती झाली आहे.

टॅग्स :washimवाशिमRevenue Departmentमहसूल विभाग