शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रस्तरीय मतदान अधिकाऱ्यांविरुद्धची कारवाई गुलदस्त्यात   

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 18:13 IST

मतदार पुनर्रीक्षण यादी कार्यक्रमांतर्गत कर्तव्यात दिरंगाई करणा-या केंद्रस्तरीय मतदान अधिका-यांविरुद्ध (बीएलओ) योग्य ती कारवाई करण्यासंदर्भात निवडणूक विभागाने १७ जुलै रोजी प्राथमिक शिक्षण विभागाकडे पाठविलेल्या प्रस्तावावर अद्याप कोणतीच कार्यवाही नाही.

वाशिम - मतदार पुनर्रीक्षण यादी कार्यक्रमांतर्गत कर्तव्यात दिरंगाई करणा-या केंद्रस्तरीय मतदान अधिका-यांविरुद्ध (बीएलओ) योग्य ती कारवाई करण्यासंदर्भात निवडणूक विभागाने १७ जुलै रोजी प्राथमिक शिक्षण विभागाकडे पाठविलेल्या प्रस्तावावर अद्याप कोणतीच कार्यवाही नाही. कारवाईचा प्रस्ताव गुलदस्त्यात असल्याने निवडणूक विभाग काय पाऊल उचलणार, याकडे लक्ष लागून आहे.जिल्ह्यात १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार पुनर्रीक्षण यादीच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु आहे. खासगी शाळेचे शिक्षक, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक तसेच नगर परिषदेचे शिक्षक आदींवर केंद्रस्तरीय मतदान अधिकाºयांची (बीएलओ) जबाबदारी सोपविली आहे. निवडणुकीच्या कामात काही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) कामचुकारपणा करीत असल्याचे निवडणूक विभागाच्या निदर्शनात येत आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांना घरोघरी भेटी देवून मतदारांसंबंधी माहिती गोळा करावयाची आहे. गोळा केलेली माहिती बी.एल.ओ. हायब्रीड अ‍ॅपमध्ये भरणे अनिवार्य आहे. वाशिम तालुक्यात जवळपास २० बीएलओ यांनी कामकाजात दिरंगाई केल्याचे जुलै महिन्यातच आढळून आले होते. सोपविलेली कामे व्यवस्थित पार न पाडणे, आढावा सभेस उपस्थित न राहणे, दूरध्वनीद्वारे संपर्क साधूनही प्रतिसाद न देणे, निवडणुकीसारख्या अति महत्त्वाच्या कामामध्ये अडथळा निर्माण करणे आदी प्रकरणी या २० बीएलओंवर ठपका ठेवण्यात आला होता. निवडणुकीच्या कामकाजात दिरंगाई करणाºया २० ‘बीएलओ’विरूद्ध योग्य ती कार्यवाही करण्यासंदर्भात वाशिम तहसिल कार्यालयाच्या निवडणूक विभागाने १७ जुलै रोजी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर केला. पावणे दोन महिन्याचा कालावधी उलटत असतानाही, अद्याप कामचुकार बीएलओंविरूद्ध कोणतीच कार्यवाही नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. निवडणूक विभागाने शिक्षण विभागाला दोन दिवसांपूर्वी स्मरणपत्र देऊन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मागितल्याने आता शिक्षण विभाग कामाला लागला असल्याचे दिसून येते.

टॅग्स :Electionनिवडणूकnewsबातम्या