शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात ईद उत्साहात साजरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 15:26 IST

वाशिम : रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर ५ जून रोजी जिल्हाभरातील मुस्लिम समाज बांधवांनी ईदगाह येथे ईद-उल-फितरची नमाज अदा केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर ५ जून रोजी जिल्हाभरातील मुस्लिम समाज बांधवांनी ईदगाह येथे ईद-उल-फितरची नमाज अदा केली. जिल्ह्यात ईद उत्साहात साजरी झाली.वाशिम शहरातील ईद गाह येथे बुधवारी सकाळपासून समाजबांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम समाजबांधवांना एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. मुस्लिम समाजबांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची ईदगाह येथे उपस्थिती होती. रिसोड शहरातही रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळपासुनच सर्वच समाजातील नागरिकांनी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देत जातीय सलोख्याचे  परिचय दिला. ईद साजरी करण्यासाठी सर्व मुस्लीम बांधव बुधवारी सकाळी ८ वाजतापासुनच चाँदणी चौक येथे जमा झाले होते. यावेळी रिसोडचे शाही इमाम मोहम्मद दयार अब्दुल कदीर यांच्या नेतृत्वात सर्व लहान थोर मुस्लीम बांधव ईदगाह वर पोहचून  सकाळी ९.३० वाजता सामुहीक नमाज पठण करण्यात आली. यावेळी सर्व उपस्थित मुस्लीम बांधवाना शाही इमाम मोहम्मद दयार अब्दुल कदीर यांनी उपदेश देतांना सांगितले  की रमजान महिण्याचे पावित्र आपण वर्षभर जपावे. गोरगरीबांना मदत करा. कुणावरही अन्याय करू नका. समाजात सर्वत्र शांतता नांदण्यासाठी प्रयत्न करा.वाईट गोष्टींन पासुन दुर रहा, असा उपदेश त्यांनी दिला. देशात सर्वत्र शांतता नांदावी यासाठी प्रार्थना करण्यात आली. ईदगाह परिसरात ठाणेदार अनिल ठाकरे यांच्यावतीने मोठा स्टॉल उभारून गुलाब पुष्प देवुन मुस्लीम बांधवाचे स्वागत आमदार अमित झनक, तहसिलदार राजु सुरडकर, ठाणेदार अनिल ठाकरे, प्रभाकर पाटील यांच्यासह मान्यवरांनी गुलाब पुष्पदेवुन स्वागत केले. याप्रमाणेच शिरपूर, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा, अनसिंग, शेलुबाजार, आसेगाव येथेही ईद उत्साहात साजरी करण्यात आली.

टॅग्स :washimवाशिमRamadanरमजान