शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

खरबूज-टरबूजांच्या मळ्यात चराईसाठी सोडली गुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 15:56 IST

पिकांतून उत्पादनाची आशा नसल्याने हताश शेतकºयांनी या पिकांत गुरे चराईसाठी सोडली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी (वाशिम) : यंदाच्या उन्हाळी हंगामाच्या मध्यंतरीच अडाण नदीचे पात्र कोरडे पडले. त्यामुळे या नदीपात्रात लागवड केलेली खरबूज, काकडी, टरबुजाची पिके सुकली आणि शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. आता या पिकांतून उत्पादनाची आशा नसल्याने हताश शेतकºयांनी या पिकांत गुरे चराईसाठी सोडली आहेत. त्याचा फायदा परिसरातील पशूपालकांना मोठा आधार झाला आहे. कारंजा-मानोरा मार्गावर इंझोरीनजिक असलेल्या पुलाच्या खाली अडाण नदीच्या पात्रात दरवर्षी मोठ्या प्रमाणात खरबुज, टरबूज आणि काकडी या फळपिकांची लागवड केली जाते. नदी पात्राच्या गाळपेर क्षेत्रातील या पिकांना नदीपात्रातील पाण्याचाच आधार असतो. त्यापासून शेतकºयांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळतेच शिवाय परिसरातील शेतमजुरांच्या हाताला कामही मिळते. यंदाही या नदीच्या पात्रात शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात फळपिकांची लागवड केली. तथापि, यंदा उन्हाळ्याची चाहुल लागताच अडाण नदीचे पात्र कोरडे पडले. त्यामुळे या नदीपात्रातील शेतकºयांची बहरलेली फळपिके संकटात सापडली. अशावेळी शेतकºयांनी नदीपात्रात खड्डे खोदून त्यातील पाण्याचा आधारे कशीबशी पिके वाढविली. त्यापासून जेमतेम उत्पादन झाले; परंतु यातून खर्चही वसुल झाला नाही. आता नदीपात्रातील खड्ड्यांतूनही पिके जगविणे कठीण झाले असून, ही पिके सुकत चालली आहेत. त्यामुळे शेतकºयांनी पिके जगविण्याचा प्रयत्नच सोडला आणि गुरांच्या चराईसाठी मोकळे रान केले. शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तरी, चाराटंचाईच्या काळात परिसरातील गुरांचे पोट यामुळे भरू लागल्याने पशूपालकांची मोठी समस्याही सुटली आहे. त्यातच या नदीपात्रातील गाळमिश्रीत पाणीही गुरांची तहान भागविण्यासाठी उपयोगी पडत आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीagricultureशेती