शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा येथे पोलिस कोठडीतील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 23:25 IST

वनविभागातील सागवान चोरी प्रकरणात पकडलेल्या आरोपीला न्यायालयाने १ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, कोठडीत असतानाच २९ नोव्हेंबरच्या रात्री आरोपीने चादर फाडून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आरोपीविरूद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देचादर फाडून केला गळफास घेण्याचा प्रयत्नआरोपीविरूद्ध आणखी एक गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम): वनविभागातील सागवान चोरी प्रकरणात पकडलेल्या आरोपीला न्यायालयाने १ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, कोठडीत असतानाच संबंधित आरोपीने अंगावर घेणारी चादर फाडून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिस जमादार राजेश नंदलाल दिवडिया यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरूद्ध २९ नोव्हेंबरच्या रात्री आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलम ३८० भादंविच्या गुन्ह्यात २९ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आलेला आरोपी शाकिर खान युसूफ खान (वय २० वर्षे, राहणार कारंजा) यास न्यायालयाने गुन्ह्यातील अधिक तपासाच्या उद्देशाने १ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. मात्र, २९ नोव्हेंबरच्या रात्री आरोपी शाकिर खान याने अंगावर घेणा-या चादरीचा काही भाग हाताने फाडून तो स्वत:च्या गळ्याला आवळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिस जमादार दिवडिया यांच्या फिर्यादीवरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी शाकिर खान याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास कारंजा पोलीस करीत आहेत. दरम्यान, आरोपीची प्रकृती बिघडल्यामुळे त्यास अमरावती येथे उपचारार्थ पाठवण्यात आले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा