शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतींची पोट निवडणूक; दोन ठिकाणी सार्वत्रिक निवडणूक

By नंदकिशोर नारे | Updated: October 10, 2023 15:31 IST

जिल्हा निवडणूक विभागाकडून रिक्त पदांची सुधारित यादी जाहीर

वाशिम : डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायती आणि नव्याने स्थापित व सन २०२२ मध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणुका न होऊ शकलेल्या ६० ग्रामपंचायतींच्या ७६ रिक्त सदस्यपदांसह ४ थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणालीद्वारे तसेच ग्रामपंचायतीतील रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. रिक्त पदांच्या संख्येमुळे यापूर्वी संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे जिल्हा निवडणूक विभागाने सुधारित यादी जाहीर केली आहे.

निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील.जिल्हा निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या सुधारित यादीनुसार जिल्ह्यातील वाशिम, मालेगाव, रिसोड, मंगरुळपीर, कारंजा व मानोरा तालुक्यातील निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे सदस्य / थेट सरपंचाच्या जागा रिक्त झालेल्या ६० ग्रामपंचायतीतील ७६ सदस्यांच्या व ४ थेट सरपंचाच्या ग्रामपंचायतीमध्ये असे एकूण ८० रिक्त जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत. शिवाय, मुदत संपलेल्या मंगरुळपीर तालुक्यातील पोटी आणि कारंजा तालुक्यातील कामठवाडा या दोन ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.

तालुकानिहाय ग्रामपंचायतींमधील रिक्त सदस्य व सरपंच पदेतालुका - ग्रामपंचायती - रिक्त सदस्य पदे - रिक्त सरपंच पदे

वाशिम - ०७ - ११ - ००मालेगाव - १९ - २५ - ०१

रिसोड - ०३ - ०२ - ०१मंगरुळपीर - ०८ - १० - ०१

कारंजा - १३ - १६ -०१मानोरा - १० - १२ -००

सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती

१) कामठवाडा, तालुका कारंजा२) पोटी, तालुका मंगरुळपीर

असा आहे निवडणूक कार्यक्रम

नामनिर्देशन पत्रे सादर करणे - १६ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३नामनिर्देशन पत्रांची छाननी - २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजतापासून

नामनिर्देशन माघारीची मुदत - २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंतचिन्ह वाटप, उमेदवारांची अंतिम यादी - २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजतानंतर

प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया - ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७:३० वाजेपासून ते सायंकाळी ५:३०मतमोजणी आणि निकाल प्रक्रिया - ६ नोव्हेंबर

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतwashimवाशिमElectionनिवडणूक