शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी!

By admin | Updated: October 14, 2016 02:33 IST

शेतक-यांची फसवणूक; बाजार समित्यांमधील प्रकार

संतोष वानखडे वाशिम, दि. १३- शासनाने सोयाबीनला २८५0 रुपये हमीभाव दिलेला असतानाही, वाशिम जिल्ह्यासह पश्‍चिम वर्‍हाडातील अनेक बाजार समित्यांमध्ये हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी सुरू आहे. परिणामी, शेतकर्‍यांच्या अडचणीत आणखी भर पडली.गत तीन वर्षांपासून पश्‍चिम वर्‍हाडातील शेतकरी दुष्काळी परिस्थितीला सामोरे जात आहे. यावर्षी निसर्गाची साथ मिळाल्याने पीक परिस्थिती बर्‍यापैकी आहे. मात्र, बाजारभाव कोसळल्याने शेतकर्‍यांची ह्यदैनाह्ण संपता संपेना, अशी परिस्थिती आहे. नवीन सोयाबीन घरात येण्यापूर्वी चार ते साडेचार हजार रुपये क्विंटल असा दर होता. आता हा दर २४00 ते ३000 रुपयादरम्यान स्थिरावत आहे. शेतकर्‍यांची फसवणूक होऊ नये म्हणून शासनाने सोयाबीनला २८५0 रुपये क्विंटल, असा हमीभाव दिला. त्यामुळे बाजार समित्यांनी यापेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी करणे नियमात बसणारे नाही. तथापि, या हमीभावाला धाब्यावर बसवून जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला २४00 ते २६00 असा बाजारभाव दिला जात आहे. हाच प्रकार पश्‍चिम वर्‍हाडातील अन्य बाजार समित्यांमध्येही सुरू आहे. भिजलेल्या सोयाबीनबरोबरच चांगल्या प्रतीच्या सोयाबीनलाही २७00 रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांची सर्रास लुट सुरू आहे. यासंदर्भात वाशिम जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांनी खासदार भावना गवळी, आमदार अमित झनक यांच्याकडे तक्रारी नोंदविल्या आहेत. या तक्रारींची दखल म्हणून गवळी व झनक यांनी जिल्हा उपनिबंधकांना याप्रकरणी योग्य ती चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी होत असल्याने शेतकरी प्रशासकीय यंत्रणेसमोर हतबल ठरला आहे. -हमीभावापेक्षा कमी दराने बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची खरेदी होत असल्याच्या शेतकर्‍यांच्या तक्रारी आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समित्यांच्या व्यवहारावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना केल्या. शेतकर्‍यांची फसगत होऊ नये म्हणून हमीभावाचा नियम डावलणार्‍यांविरोधात कारवाई होणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांवर अन्याय होत असेल, तर शेतकरी हितार्थ शिवसैनिक वेळप्रसंगी रस्त्यावरही उतरतील.- भावना गवळी,खासदार, वाशिम-यवतमाळ मतदारसंघ- शासनाने सोयाबीनला २८५0 रुपये क्विंटल, असा हमीभाव जाहीर केलेला आहे. या दरानुसार सोयाबीनची खरेदी होणे आवश्यक आहे. या प्रकरणी योग्य ती चौकशी केली जाईल. - ज्ञानेश्‍वर खाडे,जिल्हा उपनिबंधक, वाशिम.