शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूरच्या पक्क्या अतिक्रमणावर पोलीस बंदोबस्तात चालला 'गजराज' 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 15:21 IST

शिरपूरचा विकास आराखडा तयार करण्यासाठी प्राथमिक स्तरावरील कार्यवाही म्हणून रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला अखेर ७ सप्टेंबरपासून प्रारंभ करण्यात आला.

ठळक मुद्देया मोहिमेदरम्यान जेसीबीने रस्त्यालगतचे पक्के  अतिक्रमण उद्ध्वस्त करण्यात आले. अतिक्रमण हटाव मोहिमेच्या वेळी ग्रामस्थांची मोठी गर्दी उसळली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम): उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये शिरपूरचा विकास आराखडा तयार करण्यासाठी प्राथमिक स्तरावरील कार्यवाही म्हणून रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला अखेर ७ सप्टेंबरपासून प्रारंभ करण्यात आला. यावेळी पोलीस बंदोबस्तात पक्क्या अतिक्रमणावर गजराज फिरविण्यात आला. ग्रामपंचायत, भूमीअभिलेख विभाग, तसेच महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत ही मोहिम राबविण्यास सुरुवात करण्यात आली.वाशिम जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या शिरपूर येथे रस्त्यालगतच्या अतिक्रमणामुळे येथे विविध धार्मिक उत्सवात येणाºया भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन माजी जि.प. सदस्य मो. इमदाद बागवान यांनी प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदन सादर करून अतिक्रमण हटविण्याची मागणी केली; परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २१ फेब्रुवारी २०१८ रोजी सुनावणी केली. यात शिरपूर येथील अतिक्रमण महिनाभरात हटवून शिरपूरचा विकास आराखडा तीन महिन्यांत तयार करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. तथापि, निर्धारित मुदतीत हे अतिक्रमण हटविण्यात आले नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने प्रशासनाला न्यायालयाच्या अवमानना प्रकरणी नोटीसही बजावली. त्यानंतर प्रशासनाने भूमीअभिलेख विभागाकाडून गावातील अतिक्रमणाचे मोजमाप करून घेण्यात आले; परंतु या प्रक्रियेचे शुल्क ग्रामपंचायतने न भरल्याने भूमीअभिलेख विभागाने मोजणी अहवाल दिला नाही. त्यामुळे कोणाचे नेमके किती अतिक्रमण आहे. हे कळायला ग्रामपंचायतकडे मार्गच नव्हता. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहिम रखडली आणि लोकप्रतिनिधींसह ग्रामस्थ संभ्रमात पडले. अखेर ग्रामपंचायतने जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर करून भूमीअभिलेख विभागाला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्याची मागणी केली. तो अहवाल गुरुवार ६ सप्टेंबर रोजी प्राप्त झाला आणि शुक्रवार ७ सप्टेंबरपासून ग्रामपंचायतने महसूल, भूमीअभिलेख व पोलीस प्रशासनाच्या पुढाकारात अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यास सुरुवात केली. या मोहिमेदरम्यान जेसीबीने रस्त्यालगतचे पक्के  अतिक्रमण उद्ध्वस्त करण्यात आले. अतिक्रमण हटाव मोहिमेच्या वेळी ग्रामस्थांची मोठी गर्दी उसळली होती.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन