शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मिनी मंत्रालयात ‘बजेट’ची धामधूम; ग्रामीण जनतेला काय मिळणार?

By संतोष वानखडे | Updated: January 14, 2024 17:27 IST

अर्थसंकल्पाकडे लक्ष : २४ जानेवारीला सादर होणार अर्थसंकल्प.

वाशिम : ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प (बजेट) बुधवार, २४ जानेवारीला सादर होणार आहे. पूर्वतयारी म्हणून बैठकांचा सपाटा सुरू असून, ग्रामीण भागासाठी नवीन काय मिळणार? याकडे ग्रामीण जनतेचे लक्ष लागून आहे.

निवडणुकांचे वर्ष म्हणून सन २०२४ कडे पाहिले जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीचा बिगूल केव्हा वाजेल, याचा नेम नाही. केंद्र सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. आचारसंहितेपूर्वी जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी यंदा अगोदरच नियोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नातून कोणत्या विभागाला किती प्रमाणात निधी द्यावयाचा, नवीन योजनांची आखणी, आवश्यकतेनुसार प्राधान्यक्रम ठरविणे, आगामी वर्षात विविध मार्गाने येणाऱ्या उत्पन्नाचा अंदाज आणि त्याचे विभागनिहाय नियोजन आदींचा ताळेबंद म्हणून दरवर्षी साधारणत: फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्प सभागृहासमोर मांडला जातो. यंदा २४ जानेवारीला अर्थसंकल्प मांडला जाणार असून, त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेत धामधूम सुरू असल्याचे दिसून येते. यंदाच्या अर्थसंकल्पातून ग्रामीण जनतेला काय मिळणार? याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे. स्वउत्पन्न वाढीसाठी हवे ठोस प्रयत्न!

जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प अवघा ११ ते १३ कोटींच्या आसपास असतो. ग्रामीण लोकसंख्येचा विचार करता ११ ते १३ कोटींचे बजेट खूपच तोकडे ठरते. ‘बजेट’ वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेला स्वउत्पन्नाचे मार्ग शोधून त्यावर प्रभावी अंमलबजावणी करावी लागणार आहे.

टॅग्स :washimवाशिम