शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही बीएसएनएलचा वीज पुरवठा खंडितच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 14:38 IST

शिरपूरसह चार गावांमधील बीएसएनएल कार्यालयाचा खंडित केलेला वीज पुरवठा सुरळित करण्यात आला नाही.

- सुनील काकडे  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सद्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून कधीही नैसर्गिक आपत्ती ओढवू शकते. त्यामुळे महावितरणने बीएसएनएलच्या कुठल्याही कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित करू नये, खंडित केला असल्यास तो तत्काळ जोडावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी ७ आॅगस्ट रोजीच दिले; परंतु त्यानंतरही शिरपूरसह चार गावांमधील बीएसएनएल कार्यालयाचा खंडित केलेला वीज पुरवठा सुरळित करण्यात आला नाही. यामुळे बुधवारप्रमाणेच गुरूवारीही ब्रॉडबॅण्ड सेवा ठप्प राहिल्याने बँकांसह अन्य कार्यालयांचे कामकाज खोळंबल्याचे दिसून आले.वीज देयक थकीत असल्याने महावितरणने बुधवारी अनसिंग, शिरपूर, केकतउमरा आणि जऊळका येथील बीएसएनएलच्या कार्यालयांचा वीज पुरवठा खंडित केला. यामुळे ब्रॉडबॅण्ड सेवा ठप्प झाल्याने नमूद सर्व गावांमध्ये बँकांची कामे पूर्णत: विस्कळित झाली. शिरपूर येथेही बँकींग व्यवहारांना फटका बसण्यासह मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारांची नोंदणी करणाºया कार्यालयातील व्यवहार पूर्णत: बंद झाले. पोलिस स्टेशनमधील आॅनलाईन तक्रार पोर्टलही इंटरनेटअभावी ठप्प झाले. दरम्यान, ही कारवाई सद्य:स्थितीत योग्य नसून बीएसएनएलच्या कुठल्याच कार्यालयाचा विद्यूत पुरवठा खंडित करू नये. केला असल्यास तो तत्काळ पुर्ववत करावा आणि केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल १० आॅगस्टपुर्वी सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकाºयांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना दिले; मात्र ८ आॅगस्टपर्यंत त्याचे पालन झालेले नव्हते. यामुळे शिरपूर व अन्य गावांतील बँकींग व्यवहारांसह इंटरनेटची गरज भासणाºया कार्यालयांचे कामकाज खोळंबल्याचे दिसून आले.

‘बीएसएनएल’कडे ५० लाखांवर थकबाकीशिरपूर येथील बीएसएनएलच्या कार्यालयासह वाशिम जिल्ह्यातील अन्य बीएसएनएल कार्यालयांकडे असलेली वीज देयकांची थकबाकी ५० लाखांपेक्षा अधिक झाली आहे. ही रक्कम वसूल होणे अशक्य ठरत असल्यानेच महावितरणकडून बीएसएनएलचा विद्यूत पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नैसर्गिक आपत्तीच्या वेळी इंटरनेट सुविधा कार्यान्वित असणे आवश्यक असल्याच्या सूचना देवून जिल्ह्यातील बीएसएनएलच्या कुठल्याही कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित करू नये. केला असल्यास तो पुर्ववत करावा, अशा जिल्हाधिकाºयांच्या आदेशावरून महावितरणने अनसिंगच्या कार्यालयाचा वीज पुरवठा सुरळित केला आहे. लवकरच अन्य गावांमधील बीएसएनएलचा वीज पुरवठाही सुरू केला जाईल.- आर.जी.तायडे, कार्यकारी अभियंता, महावितरण

टॅग्स :washimवाशिमBSNLबीएसएनएलShirpur Jainशिरपूर जैन