शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

‘बीएसएनएल’चा वीज पुरवठा खंडित; ‘ब्रॉडबॅन्ड’ सेवा ठप्प झाल्याने बँकींग व्यवहार कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 15:20 IST

शिरपूरजैन (वाशिम) : दरमहा प्राप्त होणारे वीज देयक अदा करण्यासाठी कुठलीही आर्थिक तरतूद केली जात नसल्याने महावितरणने येथील ‘बीएसएनएल’चा वीज पुरवठा खंडित करण्याची कार्यवाही सोमवारी केली.

 लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूरजैन (वाशिम) : दरमहा प्राप्त होणारे वीज देयक अदा करण्यासाठी कुठलीही आर्थिक तरतूद केली जात नसल्याने महावितरणने येथील ‘बीएसएनएल’चा वीज पुरवठा खंडित करण्याची कार्यवाही सोमवारी केली. दरम्यान, वीजच नसल्याने ‘लॅण्डलाईन’ सेवेसह ‘ब्रॉडबॅन्ड’ सेवाही ठप्प झाल्याने बँका, दुय्यम निबंधक कार्यालय, सेतू सुविधा केंद्रांमधील कामकाज ठप्प झाले असून नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.शिरपूर येथील ‘बीएसएनएल’च्या कार्यालयाकडे वीज वितरण कंपनीचे मागील काही महिन्यांपासून वीज देयक थकीत आहे. ते अदा करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने अखेर १८ फेब्रूवारीला वीज पुरवठा खंडित केला. यामुळे मात्र गावातील बँक आॅफ महाराष्ट्र, जनता कमर्शियल बँक, दुय्यम निबंधक कार्यालय, सेतू सुविधा केंद्रातील सेवा ठप्प झाल्याने नागरिकांसह अधिकारी व कर्मचारीही त्रस्त झाले. याकडे ‘बीएसएनएल’ने लक्ष पुरवून खंडित झालेला वीजपुरवठा सुरळित करून घेण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी होत आहे. मागील काही महिन्यापासून ‘बीएसएनएल’ कार्यालयाचे वीज देयक अदा करणे तसेच जनरेटरमध्ये डिझल भरण्यासाठी पैसे उपलब्ध होत नसल्याने  समस्या निर्माण झाली आहे. देयक थकबाकीमुळे महावितरणने वीज पुरवठा खंडित केला. ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देण्यात आली असून सेवा सुरळित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.बी. एस. अंभोरे उपविभागीय अधिकारी, ‘बीएसएनएल’, मालेगाव यापूर्वी ‘बीएसएनएल’च्या विस्कळित सेवेचा अनेकवेळा अडचणी सहन कराव्या लागला. आता तर ‘बीएसएनएल’चा वीज पुरवठा खंडित झाल्याने ‘ब्रॉडबॅन्ड’ सेवा ठप्प झाली आहे. त्याचा दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. धीरज कुमार शाखाधिकारी, बँक आॅफ महाराष्ट्र, शिरपूर मी नेहमीप्रमाणे सोमवारी बँकेमध्ये ‘आरटीजीएस’ करायला गेलो असता ‘ब्रॉडबॅन्ड’ सेवा खंडित असल्याने ते होऊ शकले नाही. यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागला.- प्रशांत क्षीररसागर,व्यावसायिक, शिरपूर जैन

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैनBSNLबीएसएनएल