लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : विविध प्रकारच्या कागदपत्रांसाठी तसेच अनुदान, मानधनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली येथील तहसिल कार्यालय परिसरातील दलालांकडून सर्वसामान्य नागरिकांची लुट केली जात आहे.मानोराचे तहसीलदार डॉ.सुनिल चव्हाण हे दिर्घ रजेवर आहेत. तहसिल कार्यालय परिसरातील काही दलालांनी काही कर्मचाºयांशी संधान साधून ‘दुकानदारी’ सुरू केल्याच्या सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी आहेत. विविध प्रकारची कामे करून देण्यासाठी दरही ठरले असल्याची विश्वसनीय माहिती आहे. काही कारणास्तव ज्या नागरिकांचे कामे तहसील कार्यालयात अडली आहे, अशा नागरिकांना गाठून काम करुन देण्याच्या नावाखाली सर्रास आर्थिक लुट केली जात आहे. साधारणत: नवीन रेशनकार्ड काढण्यासाठी २ हजार रुपये प्रतिज्ञापत्र, दोनशे ते तिनशे रुपये शुल्क, उत्पन्नाचा दाखला २०० रुपये, सॉल्वन्शीसाठी एक हजार रुपये अशा विविध कामाकरीता दर ठरविण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. तहसिल कार्यालय परिसरातून दलाल हद्दपार करावे, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतूून होत आहे.- मी रजेवर आहे. तथापि, संबंधित अधिकारी, कर्मचाºयांना सूचना दिल्या जातील. सर्वसामान्य जनतेची कामे अडणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल.- डॉ. सुनील चव्हाणतहसिलदार, मानोरा
मानोरा तहसील कार्यालयात दलालांचा सुळसुळाट; नागरिकांची लुट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 15:45 IST