शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल, शौचालयासाठी दलालांकडून लाभार्थींची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 16:31 IST

आतापर्यंत १० ते १२ लाभार्थींनी पंचायत समितीच्या सभापतींकडे तक्रारी केल्या असून, त्याची दखलही घेण्यात आली.

रिसोड : घरकुल, शौचालयाचे अनुदान काढून देतो, असे म्हणत ग्रामीण भागात दलालांकडून लाभार्थींची लूट सुरू असल्याचा प्रकार रिसोड तालुक्यात समोर येत आहे. आतापर्यंत १० ते १२ लाभार्थींनी पंचायत समितीच्या सभापतींकडे तक्रारी केल्या असून, त्याची दखलही घेण्यात आली.स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत ग्रामीण भागात वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी शासनाकडून १२ हजार रुपयाचे अनुदान दिले जाते तसेच घरकुल योजनेसाठी सव्वा ते दीड लाखादरम्यान अनुदान मिळते. रिसोड तालुक्यात अनेक लाभार्थींना घरकुल व शौचालयाचे अनुदान मिळाले नाही. ही संधी साधून ग्रामीण भागात दलालांकडून नागरिकांची लुबाडणूक सुरू असल्याचे समोर येत आहे. घरकुल व शौचालयाचे अनुदान काढून देतो तसेच नव्याने घरकुल, शौचालयसुद्धा मंजूर करून घेतो, असे आमिष दाखवून लाभार्थींकडून दोन ते दहा हजार रुपये उकळले जात आहेत. ज्या लाभार्थींचे नाव अनुदानाच्या यादीत आहे, अशा लाभार्थींच्या घरी जाऊन तुमचे नाव यादीत असून, लवकरच अनुदान काढून देतो, कागदपत्रात काही त्रुटी असल्या तरीसुद्धा वरिष्ठांशी बोलून तुमच्या बँक खात्यात अनुदान जमा करून देतो, असे आमिष दलालांकडून लाभार्थींना दाखविले जात आहे. याकडे पंचायत समितीने लक्ष देण्याची मागणी लाभार्थींमधून होत आहे.

काही दलालांकडून लाभार्थींना आमिष दाखवून लुबाडणूक होत असल्याचे प्रकार समोर येत आहे. लाभार्थींनी घरकुल व शौचालय अनुदानासाठी कोणत्याही दलालाशी संपर्क साधू नये तसेच कुणालाही पैसे देऊन नये. घरकुल, शौचालयसंदर्भात प्रशासनाशी थेट संपर्क साधावा. - गिता संजय हरिमकरसभापती, पंचायत समिती रिसोड

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड