शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गांवरील पुलांचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 16:45 IST

वाशिम: जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील नाल्यांवर बांधण्यात येत असलेल्या पुलांचे काम अतिशय संथ आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील नाल्यांवर बांधण्यात येत असलेल्या पुलांचे काम अतिशय संथ असून, पुलांच्या कामांसाठी वळणमार्गांवर केवळ मातीचा वापर झाल्याने मंगळवारी रात्री अवकाळी पावसानंतर चिखल तयार होऊन येथे वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला. विविध ठिकाणी सुमारे दोन तास वाहनांची मोठी रांग उभीर होती. जिल्ह्यात पाच मार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला असून, याची कामे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्यावतीने करण्यात येत आहेत. या मार्गांमुळे जिल्ह्यात दळणवळणाची सुविधा अद्ययावत होणार असल्याने नागरिकांत समाधानाचेही वातावरण आहे; परंतु कामाची संथगती वाहनचालकांसह प्रवासीवर्गासाठी त्रासदायक ठरत आहे. मार्गाचे ेकाम करण्यापूर्वी पुलाची उभारणी आवश्यक असल्याने या मार्गावर विविध ठिकाणी येत असलेल्या नाल्यांवर पुलांची कामे करण्यात येत आहेत. यासाठी पूर्वीचे पूल खोदण्यात आले. अशात वाहतुक ठप्प होऊ नये म्हणून वळणमार्गही तयार करण्यात आले; परंतु हे वळणमार्ग करताना त्यावर केवळ माती आणि मुरमाचा वापर झाला असून, मंगळवारी रात्री जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे या पुलांवर ठिकठिकाणी खोळंबा झाला. जवळपास दोन तास  वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. या वळणामार्गावरील चिखलात वाहनाची चाके फसून अपघाताची होण्याची भिती असल्याने काही वाहनधारकांनी मार्ग बदलणेच पसंत केल्याचेही दिसले. येत्या दीड महिन्यात सुरू होणारा पावसाळा लक्षात घेता पुलांची ही कामे लवकर पूर्ण करण्याची मागणी वाहनधारक करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमhighwayमहामार्ग