शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

एका महिन्यात तीन वेळा वाहून गेला नदीवरील पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 16:17 IST

९ जुलै रोजी तिसºयांदा हा पूल वाहून गेल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : आर्णि  ते अकोला या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम मागील एक वषार्पेक्षा अधिक कालावधीपासून  सुरू आहे.   १६१ ए या क्रमांकाच्या या  बांधकामामध्ये होत असलेल्या दिरंगाई आणि कंत्राटदार, कंपनीचा बेजबाबदारपणाचा फटका मानोरा तालुक्यातील असंख्य नागरिकांना वारंवार सहन करावा लागत आहे. बेलोरा गावानजिक नदीवरील पूलाचे बांधकाम करण्यात येत आहे त्याकरिता रहदारीसाठी तात्पुरता पूल बांधण्यात आला. तो एका महिन्यात तीनवेळा वाहून गेला. यामुळे शेतकºयांची शेतीची कामे प्रभावित झाली असून वाहनधारकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.मानोरा दिग्रस कडे ये-जा करणाºया वाहनधारकांसाठी कंपनी प्रशासनाने थातूरमातूर आणि निकृष्ट अशा पर्यायी पुलाची व्यवस्था केली होती. तो पहिल्याच पावसात वाहून गेला होता.या कामावर फक्त ६ मजूर काम करत असतांना त्यातही आठवडयात केवळ दोन ते तीन दिवस काम चालु रहायचे. यावेळी ग्रामस्थांनी  ठेकेदाराला सागितले की,  मोठी आहे तुम्ही अगोदर हा पूल तयार करा परंतु लाँकडाऊन मुळे मजूर जास्त कामावर नसल्याचे सांगण्यात आले.  ९ जुलै रोजी तिसºयांदा हा पूल वाहून गेल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. तसेच पुल वाहून गेला त्यामुळे आम्हाला शेतात जाण्या करीता रस्ता नाही ,त्यामुळे शेतीचे कामे रखड़ली असल्याचे मत बेलोरा येथील शेतकरी विलास ठाकरे यांनी व्यक्त केले.

शेतात पाणी साचल्याने नुकसानपूल बांधकामा दरम्यान खोराडी नाल्याचे पाणी अडवल्यामुळे प्रल्हाद राठोड गव्हा आणि विष्णू जाधव माहूली ह्या दोन शेतकº्यांच्या जवळपास सात एकर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या शेतकºयांचा लाखो रुपयांचा नुकसानीलाही सदरील बांधकाम कंपनी प्रशासन जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.तसेच तलाठी एस डी शेजुळ यांनी पुर परस्तिथी पाहणी केली  असता त्याना हा पूल वाहून गेल्याचे दिसून आले  .

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा