शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत किसान सन्मान योजनेला ‘ब्रेक’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 17:52 IST

लोकोपयोगी योजनांसोबतच शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीला ‘ब्रेक’ लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सद्या राज्यभरातील सर्वच जिल्ह्यांमध्ये लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू असून प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी त्यात गुंतले आहेत. यामुळे मात्र अन्य लोकोपयोगी योजनांसोबतच शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीला ‘ब्रेक’ लागला आहे. पात्र शेतकऱ्यांच्या याद्यांमधील त्रुट्या दुर करण्याचे काम प्रलंबित असून याद्या ‘अपलोड’ करण्याची प्रक्रिया देखील पूर्णत: थंडावली आहे.शेतकºयांना निश्चित उत्पन्न मिळावे, या उद्देशाने केंद्र शासनाने हाती घेतलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र शेतकरी कुटुंबाची माहिती संकलित करण्याची कार्यवाही ७ फेब्रूवारीपासून जोरासोरात सुरू करण्यात आली होती. १० फेब्रूवारीपर्यंत गावनिहाय पात्र खातेधारक शेतकºयांच्या याद्या तयार करून शेतकºयांचे बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक प्राप्त करणे व त्याच्या नोंदणी विहित नमुन्यात नोंद करण्याची जबाबदारी ग्रामस्तरीय समितीने पार पाडली. त्यानंतर १५ ते २० फेब्रुवारीदरम्यान पात्र शेतकरी कुटुंबांची यादी गावामध्ये प्रसिद्ध करून त्यावर हरकती मागविण्यात आल्या. मात्र, अशातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरलेल्या काहीच शेतकºयांच्या खात्यात २ हजार रुपयांची पहिली किस्त जमा झाली असून उर्वरित शेतकरी त्यापासून अद्याप वंचित आहेत. किमान निवडणुक होईस्तोवर या योजनेला फारशी गती देखील मिळणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटूंबांच्या याद्या तयार करणे, अर्जांमधील त्रुट्या दुर करणे, याद्या वेबसाईटवर अपलोड करण्याचे काम वाशिम जिल्ह्यात जवळपास ९५ टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, सद्या निवडणुकीची धामधुम सुरू असल्याने ही प्रक्रिया काहीअंशी ठप्प झाली आहे. निवडणुकीनंतर मात्र पुन्हा त्यास गती देण्यात येणार आहे.- सागर हवालदारजिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना