शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
'Welcome my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
3
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
4
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
5
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
6
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
7
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
8
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
9
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
10
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
11
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
12
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
13
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
14
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
15
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
16
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
17
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
18
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
19
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
20
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
Daily Top 2Weekly Top 5

विमा कंपन्यांच्या मनमानीला ब्रेक; नुकसानीच्या प्रस्तावासाठी सहा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:51 IST

वाशिम : दरवर्षीच शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटाला सामोरे जावे लागते. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमाधारक शेतकऱ्यांना भरपाई मिळते. दरम्यान, ...

वाशिम : दरवर्षीच शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटाला सामोरे जावे लागते. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमाधारक शेतकऱ्यांना भरपाई मिळते. दरम्यान, किचकट प्रक्रियेमुळे अनेक शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहतात. या सर्व विमा कंपन्यांच्या मनमानीला आता ब्रेक लागणार असून, कृषी आयुक्तालयाकडून सुचविलेल्या सहा पर्यायांद्वारे शेतकरी विमा कंपन्यांना नुकसानाबाबत पूर्वसूचना देऊ शकणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

नैसर्गिक आपत्ती घडल्यानंतर, विमा संरक्षित पिकाचे नुकसान झाले असल्यास त्याबाबत ७२ तासांच्या आत मोबाइल ॲपद्वारे नोंदणी करून संबंधित विमा कंपनीला पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. मात्र, काही शेतकऱ्यांकडे स्मार्ट मोबाइल नसल्यामुळे, तसेच नेटवर्क, सर्व्हर डाऊन, अशा विविध तांत्रिक समस्यांमुळे शेतकरी नुकसानाची पूर्वसूचना ७२ तासांत देऊ शकत नव्हते. त्यामुळे अनेक शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींना आता ब्रेक लागणार आहे.

--------------------------

आधी हे होते दोन पर्याय

१ ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला आहे, ते शेतकरी संबंधित विमा कंपन्यांच्या भ्रमणध्वनीवर कॉल करून नुकसानाची सूचना देत होते. मात्र, भ्रमणध्वनीवर अनेक शेतकऱ्यांचा संपर्कच होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांची नोंद होत नव्हती.

२) मोबाइल ॲपद्वारे नुकसानीबाबत माहिती सादर करून, तसेच त्या ॲपमध्ये नुकसानीचे फोटो अपलोड करून माहिती सादर करण्यात येत होती.

---------------------

४१०० हेक्टर क्षेत्रावर नुकसान

जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात दि. ५, ६ व ७ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीने जवळपास ९०० हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे, तसेच जुलै महिन्यातही जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने ३२०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानभरपाईचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहेत.

-----------------------------

कोट

नैसर्गिक आपत्तीपासून पिकांचे संरक्षण म्हणून विमा काढला जातो. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे राहू नयेत, यासाठी टोल फ्री क्रमांक, ई-मेल, मंडळ कृषी कार्यालय, विमा कंपनी आदींशी संपर्क साधता येतो. शेतकऱ्यांना जो पर्याय सोयीस्कर ठरेल, त्यानुसार ७२ तासांच्या आत नुकसानाची माहिती नोंदवावी.

-एस.एम. तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

---------------------

हे आहेत पर्याय

क्रॉप इन्शुरन्स ॲप

विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक

विमा कंपनीचा ई-मेल

विमा कंपनीचे तालुकास्तरीय कार्यालय

कृषी विभागाचे मंडळ कृषी कार्यालय

ज्या बँकेत विमा जमा केला, ती बँक शाखा