शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

निवडणुकीतील पराजयावर मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 15:40 IST

निवडणूक निकालाचे आगामी विधानसभा तसेच जिल्हा परिषद निवडणुकांवर काय परिणाम होतील, यापासून कोणता बोध घ्यावा या अनुषंगाने राजकीय क्षेत्रात चर्चा रंगू लागल्या आहेत.

- संतोष वानखडे वाशिम : लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या निवडणूक निकालाने काँग्रेस आघाडीवर चिंतनाची वेळ आणली असून, शिवसेना-भाजपा युतीच्या गोटात उत्साह निर्माण केला. या निवडणूक निकालाचे आगामी विधानसभा तसेच जिल्हा परिषद निवडणुकांवर काय परिणाम होतील, यापासून कोणता बोध घ्यावा या अनुषंगाने राजकीय क्षेत्रात चर्चा रंगू लागल्या आहेत.यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून भावना गवळी यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर १ लाख १९ हजार ९३९ मतांची आघाडी घेत शिवसेनेचा गड पाचव्यांदा कायम राखला आहे. निवडणुकीदरम्यानचे विरोधकांचे सर्व अंदाज चुकीचे ठरवित यवतमाळ-वाशिम मतदारसंघ हा शिवसेनेचा अभेद्य गड असल्याचे गवळी यांच्या विक्रमी मताधिक्क्याने सिद्ध केले आहे. जिल्ह्यातील वाशिम विधानसभा मतदारसंघात २४ हजाराची तर कारंजा विधानसभा मतदारसंघात ३६३४ मतांची आघाडी घेत आगामी विधानसभा निवडणुक ही काँग्रेस आघाडीसाठी कठीण असल्याचे अप्रत्यक्षरित्या सुतोवाचही केले. शिवसेनेच्या विजयापेक्षा काँग्रेस आघाडीच्या दारूण पराभवामागील कारणीमिमांसेसंदर्भात राजकीय क्षेत्रात चर्चा झडत आहेत. चार, पाच महिन्यांवर विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत; त्याचप्रमाणे जिल्हा परिषद निवडणूक केव्हा लागेल, याचाही नेम नाही. ऐनवेळी कोणताही धोका नको म्हणून लोकसभा निवडणुकीतील मतदारांचा हा उत्स्फुर्त प्रतिसाद कायम ठेवण्याच्या दृष्टिने सेना, भाजपा पदाधिकारी लवकरच कामाला लागतील, असे विश्वसनीय सूत्राने सांगितले. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी काँग्रेसतर्फे लवकरच बैठक बोलावली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. लोकसभा निवडणुकीत कुठे कमी पडलो, मतदारांची नाडी ओळखण्यात कुठे चुक झाली याचे चिंतन करण्याबरोबरच या पराभवातून सावरण्यासाठी काँग्रेस आघाडीने आतापासूनच ‘ग्राऊंड लेव्हल’वर हालचाली कराव्या, असा सूरही काँग्रेसमधून उमटत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास दाखवत मतदारांनी परत एकदा शिवसेना-भाजपा युतीच्या उमेदवार भावना गवळी यांनी प्रचंड मताधिक्क्याने निवडून दिले आहे. आगामी निवडणुकीतही मतदारांचा कौल हा भाजपा सरकारने केलेल्या विकासाच्या बाजूनेच राहिल.- राजेंद्र पाटणीजिल्हाध्यक्ष, भाजपायवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. पराभवामागील कारणीमिमांसा केली जाईल. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काँग्रेसच्यावतीने लवकरच मंथन, चिंतन केले जाईल.-अ‍ॅड. दिलीपराव सरनाईक,जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :washimवाशिमyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल