शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

Boom in Automobile Sector : वाहन विक्रीत वाढ; ऑटोमोबाईल क्षेत्राला झळाळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 13:18 IST

Washim News दुचाकी, चारचाकी व ट्रॅक्टर मिळून जवळपास ३७० वाहनांची आगाऊ नोंदणी झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अनलॉकमध्ये ऑटोमाबाईल  क्षेत्राला सुगीचे दिवस आले असून, गत सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत यंदाच्या सप्टेंबरमध्ये दुचाकी, चारचाकीसह ट्रॅक्टरच्या विक्रीत चांगलीच वाढ झाली आहे.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन आहे. मे महिन्यापासून अनलॉकचे टप्पे सुरू झाले असून विविध उद्योग, व्यवसायाचे दरवाजे खुले करण्यात आले. आॅटोमोबाईल क्षेत्रही खुले झाले असून, विविध प्रकारच्या वाहनांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची पावले शोरूमकडे वळत आहेत. गतवर्षीच्या सप्टेंबर महिन्याशी तुलना करता यंदाच्या सप्टेंबर महिन्यात दुचाकी, चारचाकी व ट्रॅक्टरच्या विक्रीत वाढ झाल्याने वाहनबाजारात तेजी आल्याचे दिसून येते. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात केवळ ६५० दुचाकींची विक्री झाली होती. यंदा याच कालावधीत तब्बल १०४९ दुचाकींची विक्री झाली. ट्रॅक्टरच्या विक्रीत दर दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली. आगामी दसरा, दिवाळी सण लक्षात घेता मनपसंद वाहन मिळावे याकरीता वाहनांची आगाऊ नोंदणी करण्याकडेही ग्राहकांचा कल असल्याचे दिसून येते. दुचाकी, चारचाकी व ट्रॅक्टर मिळून जवळपास ३७० वाहनांची आगाऊ नोंदणी झाली आहे.

दुचाकीला सर्वाधिक मागणीजिल्ह्यात दुचाकी वाहनाला सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून येते. दसरा जवळ येत असल्याने मनपसंद दुचाकी दसºयाच्या मुहुर्तावर मिळावी याकरीता अनेकांनी मनपसंद दुचाकीची आगाऊ मागणी नोंदविली. वाहनबाजारात तेजी असून, दसरा दरम्यान यामध्ये आणखी तेजी येण्याचे संकेत आहेत.

वाहन बाजारात तेजीकोरोनाकाळात वाहतुक व्यवस्था प्रभावित होती. खासगी व परिवहन महामंडळाच्या बसेस, ऑटो आदी बंद असल्याने याचा फटका अनेकांना बसला. अनलॉकच्या टप्प्यात वाहन बाजारात तेजी येत आहे.- रौनक टावरी, दुचाकी वितरक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमAutomobileवाहन