वाशिम : मालेगाव तालुक्यातील मुसलवाडी येथील एका युवकाचा मृतदेह संत गाडगेबाबा आपत्कालीन पथक अकोलाच्या तरुणांनी सोमवारी वाघोली येथील नदीमधून बाहेर काढला. मुसलवाडी येथील तरुण संदीप ठाकरे हा ९ जानेवारी रोजी वाघोली येथील पैनगंगा नदीमध्ये बुडाल्याची माहिती मिळाली. तरुणाचा शोध गत तीन दिवसांपासून सुरू होता. नदीमध्ये खोल डोह असल्याने शोध घेणे कठीण झाले होते. सोमवारी ११ वाजता संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजरच्या जवानांनी शोध कार्य चालू केले. दुपारी ३ वाजताच्या सुमारास पथकाच्या जवानांनी मृतदेह शोधून काढला.
तीन दिवसांपूर्वी बुडालेल्या युवकाचा मृतदेह काढला!
By admin | Updated: January 12, 2016 02:02 IST