शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात आठ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 12:25 IST

Blood Banks in Washim : आजमितीस केवळ १२० बॅग रक्तसाठा उपलब्ध असून, तो आगामी आठ दिवसातच संपणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात शासकीय व वाशिम शहरात एक खासगी अशा दोन रक्तपेढ्या कार्यान्वित आहेत. एका रक्तपेढीला महिन्याकाठी साधारणत: २५२ बॅग रक्ताची गरज भासते; मात्र शासकीय रक्तपेढीत आजमितीस केवळ १२० बॅग रक्तसाठा उपलब्ध असून, तो आगामी आठ दिवसातच संपणार आहे. याशिवाय खासगी रक्तपेढीत दोनच दिवस पुरेल, एवढाच रक्तसाठा उपलब्ध असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.कोरोना विषाणू संसर्गापासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी जिल्ह्यात दि. १७ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. लस घेतल्यानंतर किमान दोन महिने रक्तदान करता येत नाही.  त्यामुळे रक्तदान करणाऱ्यांची संख्या झपाट्याने घटली असून, रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे. दरम्यान, लस घेण्यापूर्वी रक्तदान करण्यासंबंधी वारंवार आवाहन करण्यात येत आहे; परंतु गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात पूर्वीसारखी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आलेली नाहीत किंवा रक्तपेढीत येऊन रक्तदान करण्यासंबंधीची मानसिकताही अनेकांची राहिली नाही. त्यामुळे रक्तसाठा घटला असून येत्या काही दिवसांत रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे युवकांनी पुढाकार घेत रक्तदान करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :washimवाशिमBlood Bankरक्तपेढी