शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पांडुरंगाचा चेतन झाला १३ नेत्रहीनांचा सारथी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 16:24 IST

पांडुरंगाचा छोटा चेतन आज स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासोबतच अन्य १३ नेत्रहीनांचा सारथी झाला आहे. विशेष म्हणजे, एकमेकांच्या साथीने ही १४ जणांची टीम आपले आयुष्य मोठ्या गुण्यागोविंदाने जगत आहे.

-  सुनील काकडेवाशिम: हजार लोकसंख्येच्या केकतउमरा या गावात पांडुरंगाचे वास्तव्य... घरी अठराविश्व दारिद्र्य; पण त्यांनी कधी नियतीपुढे हार पत्करली नाही... ईश्वरानेही त्यांच्या संयमाची परीक्षा घेत त्यांच्या पदरात नेत्रहीन मुलगा टाकला; मात्र तो वेगवेगळ्या प्रकारच्या कलेचा बादशहा ठरला. तोच पांडुरंगाचा छोटा चेतन आज स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासोबतच अन्य १३ नेत्रहीनांचा सारथी झाला आहे. विशेष म्हणजे, एकमेकांच्या साथीने ही १४ जणांची टीम आपले आयुष्य मोठ्या गुण्यागोविंदाने जगत आहे.चंद्र, सूर्य, तारे, मनमोहक झाडे, फळ, फूल आणि निसर्गातील सौंदर्याचे अनेकविध पैलू डोळ्यांनी पाहायला, अनुभवायला कुणाला आवडणार नाही? परंतु जे जन्मजात दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत, त्यांना निसर्गातील या घडामोडींची अनुभूती नाहीच येऊ शकत. असे असले तरी नेत्रहीनांना मायेचे दोन शब्द, सहानुभूती आणि आपले समजणाऱ्या माणसांचा सदोदित सहवास जगण्याचे बळ प्रदान करतो. आयुष्याच्या वेड्यावाकड्या वळणावर यशाची शिखरे पादाक्रांत करण्याची प्रेरणा देतो.पांडुरंग उचितकर, विलासराव कोल्हे यांच्यासारख्या साध्या माणसांनी अशाच चांगुलपणाचा प्रत्यय देत नेत्रहीनांच्या आयुष्यात उजेड पसरविण्यासाठी संपूर्ण जीवन वेचल्याने चेतन पांडुरंग उचितकर या नेत्रहीन चिमुकल्याच्या टीममधील प्रत्येकाने ‘चेतन सेवांकुर आॅर्केस्ट्रा’च्या माध्यमातून यशाच्या दिशेने आगेकूच केली आहे. चेतन उचितकर हा स्वत: अत्यंत उत्कृष्टरीत्या हार्मोनियम वाजवितो, गायन करतो, सामाजिक जनजागृतीपर विविध विषयांवर मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये व्याख्यान देतो. यासह प्रवीण रामकृष्ण कठाळे, कैलास वसंतराव पानबुडे, संदीप केशव भगत, अमोल अर्जुना गोडघासे, दशरथ पुंजाजी जोगदंड, विजय राजाराम खडसे, भारत गोपाल खांडेकर, लक्ष्मी कैलास पानबुडे, कोमल भारत खांडेकर, अलका प्रवीण कठाळे, रूपाली फुलसावंगे, विकास गाडेकर, गजानन खडसे या उर्वरित नेत्रहीनांच्या अंगीही हार्मोनियम, तबला, बासरी, गायनाची अलौकिक कला दडलेली असून, ही नेत्रहीनांची टीम विविध ठिकाणचे कार्यक्रम गाजवत आहे. डोळसांनाही लाजवेल, अशी कामगिरी करून दाखवित आहेत. ‘चेतन सेवांकुर’च्या टीममधील प्रत्येकजण समाजातील इतरांसमोर प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून आपली छाप उमटवत आहेत. 

 

टॅग्स :washimवाशिम