शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

२९ फेब्रुवारीला जन्मलेल्या बालकांचा वाढदिवस येणार चार वर्षानंतर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 12:25 IST

लिप इयरमध्ये जन्म घेणाºया मुलांना ‘लिपलिंग्ज’ किंवा ‘लिपर्स’ म्हटले जाते.

- नंदकिशोर नारे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : लिप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना २९ दिवसाचा असतो. लिप वर्ष चार वर्षातून एकदा येत असल्याने यादिवशी जन्म घेणाऱ्या बालकांचा वाढदिवस हा चार वर्षानंतर एकदा येतो. या दिवशी जन्माला आलेले अनेक जण चार वर्षानंतर वाढदिवस साजरा करतात तर काही दरवर्षी २९ तारखेच्या अगोदर एक दिवस किंवा नंतर एक दिवस वाढदिवस साजरा करतात. २९ फेब्रुवारी २०२० रोजी जिल्हयात किती बालकांचा जन्म झाला याची माहिती घेतली असता १२ बालकांचा जन्म झाला. या सर्व बालकांचा वाढदिवस हा चार वर्षानंतर एकदा येणार आहे.यंदाचे २०२० हे लीप वर्ष आहे. वर्षातील फेब्रुवारी महिन्याव्यतिरिक्त अन्य महिने ३० किंवा ३१ दिवसाचे असतात. फेब्रूवारी महिना २८ दिवसाचा असतो, परंतु लीप वर्ष आले असता एक दिवस वाढून तो २९ दिवसाचा होतो. या दोन दिवशी ज्यांचा जन्म असतो ते त्यांचा आनदं व्दिगुणीत करणारा ‘लीप डे ’ म्हणूनही साजरा करतात. या दिवशी जन्मलेल्यांचा वाढदिवस तब्बल चार वर्षाने करावा लागतो, पळवाट म्हणून आदल्या किंवा दुसºया दिवशी अनेक जण वाढदिवस साजरा करतात. लिप इयरमध्ये जन्म घेणाºया मुलांना ‘लिपलिंग्ज’ किंवा ‘लिपर्स’ म्हटले जाते. जगभरात ५० लाख लिपर्स असल्याची माहिती आहे.जिल्हयात २९ फेब्रुवारी २०२० रोजी जन्म घेतलेल्यांमध्ये मंगरुळपीर शहरातील ग्रामीण रुग्णालयात दोन बालिकेचा जन्म झाला. यामध्ये मानोरा तालुक्यातील धामणी येथील सुमित्रा अशोक मोरकर, उमरी येथील लक्ष्मी नितीन गिरे यांना कन्यारत्न प्राप्त झाले. मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथील रुग्णालयात उर्मिला गणेश गाडे यांना व मानोरा तालुक्यातील दापुरा येथील अनिता नंदू पवार यांना मुलगा झाला.कारंजा येथील शासकीय दवाखान्यात स्वाती भोकरे, कल्पना वरठी यांना मुलगा तर दिव्या कांबळे यांना मुलगी झाली. वाशिम येथील खासगी दवाखान्यात नितिका अजय सुराणा यांना मुलगी, दमयंती राम पिंसे आर्मिजवाला यांना मुलगी , परविन शेख अमिन यांना मुलगा झाला. रिसोड येथे मंगल किरण ताकतोडे रा.गणेशपूर यांना मुलगा तर कल्पना नामदेव सावंत रा. वरखेडा यांना कन्यारत्न प्राप्त झाल्याची माहिती प्राप्त झाली.

२९ फेब्रूवारीला जन्म झालेली मुले/मुलीवाशिम : २ मुले, एक मुलगीमंगरुळपीर : २ मुलीमालेगाव : १ मुलगाकारंजा : २ मुले, एक मुलगीमानोरा : १ मुलगारिसोड : १ मुलगा, १ मुलगी

टॅग्स :washimवाशिम