शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
2
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
3
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
4
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
5
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
6
मायेची सावली! भावासाठी बहीण झाली ढाल; किडनी डोनेट करुन दिलं जीवदान, रक्षाबंधन झालं खास
7
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
8
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
9
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
10
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
11
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
12
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
13
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
14
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
15
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
16
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
17
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
18
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
19
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
20
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक

आचारसंहितेच्या तोंडावर विकासकामांचे भूमीपुजन जोरावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 15:41 IST

आचारसंहिता अवघ्या ७ ते ८ दिवसांत लागण्याचे संकेत असताना तीनही आमदारांनी विकासाचा आव आणत विकासकामांच्या भूमीपुजनाचा जणू सपाटाच लावल्याचे दिसून येत आहे.

- सुनील काकडे  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आमदारांना मतदारसंघाचा विकास करण्यासाठी शासनाकडून दरवर्षी २ कोटी रुपयांचा निधी दिला जातो. त्यानुसार, जिल्ह्यातील तीनही विद्यमान आमदारांना पाच वर्षाच्या कालावधीत प्रत्येकी १० कोटी याप्रमाणे ३० कोटींचा निधी मिळाला. दरम्यान, चालूवर्षीचा निधी खर्च करण्याबाबत उदासिनता बाळगण्यात आली आणि आता आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता अवघ्या ७ ते ८ दिवसांत लागण्याचे संकेत असताना तीनही आमदारांनी विकासाचा आव आणत विकासकामांच्या भूमीपुजनाचा जणू सपाटाच लावल्याचे दिसून येत आहे.वाशिम जिल्ह्याच्या निर्मितीला २१ वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. असे असताना या जिल्ह्यात मोठे उद्योगधंदे, उच्च शिक्षणाची सोय, दुर्धर आजारांवर उपचार, मोठे व मध्यम सिंचन प्रकल्प यासह इतरही अनेक सुविधांची वाणवा कायम आहे. यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढण्यासोबतच १० वी, १२ वी नंतर विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाकरिता परजिल्ह्यात जावे लागते. आरोग्यविषयक सुविधांअभावी कर्करोगासह अन्य दुर्धर आजारांसाठी रुग्णांना अकोला, नागपूर, औरंगाबाद, मुंबई अशा मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागते. सिंचनाची प्रभावी सुविधा नसल्याने कोरडवाहू शेतीतून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नावर शेतकऱ्यांना भागवावे लागते. दरम्यान, या सर्व समस्यांकडे लक्ष पुरवून त्या सोडविण्यासाठी जिल्ह्यातील एकाही आमदाराने ठोस तथा यशस्वी प्रयत्न केलेले नाहीत.विद्यमान स्थितीत वाशिम-मंगरूळपीर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व भाजपाचे आमदार लखन मलिक करित आहेत. कारंजा-मंगरूळपीरमध्ये भाजपाचेच राजेंद्र पाटणी; तर रिसोड-मालेगाव मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व काँग्रेसचे आमदार अमीत झनक करित आहेत. यातील लखन मलिक यांची आमदारकीची तीसरी, पाटणी यांची तीसरी; तर झनक यांची आमदारकीची दुसरी टर्म आहे; मात्र आमदारांच्या पाठीशी मोठा अनुभव असताना एकाही मतदारसंघाचा अपेक्षित विकास साध्य झाला नसल्याचे मतदारांचे म्हणणे आहे.दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता अवघ्या ७ ते ८ दिवसांत लागण्याची शक्यता असल्याने सद्य:स्थितीत तीनही विद्यमान आमदारांनी विकासकामांच्या भूमीपुजनाचा जणू सपाटा लावला आहे. विशेष म्हणजे त्याची व्हाट्सअ‍ॅप, फेसबुक या सोशल मिडियाच्या साधनांसह अन्यप्रकारे जाहिरातबाजी करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याची सर्वत्र खमंग चर्चा होत आहे.

भूमीपुजन झाले; पण पावसाळ्यात कसे होणार बंधारे?वाशिम मतदारसंघातील पूस नदीवर १९ एफआरपी सिमेंट बंधारे उभारण्यासाठी १५ कोटी १३ लाख रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला; मात्र आतापर्यंत ही कामे सुरू झाली नाहीत. आता दोन महिन्यांवर विधानसभा निवडणूक आणि ७ ते ८ दिवसांवर त्याची आचारसंहिता लागण्याचे संकेत असताना ११ सप्टेंबर रोजी आमदार लखन मलिक यांच्या हस्ते भूमीपुजन झाले; परंतु सद्या सुरू असलेल्या पावसाळ्यात नदीवर सिमेंट बंधारे कसे उभारणार, असा प्रश्न सुज्ञ मतदारांमधून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :washimवाशिम