शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

भीमा कोरेगाव घटनेचे वाशिम जिल्ह्यात पडसाद;  शांततामय मार्गाने मोर्चा, जिल्हा प्रशासनाला निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 17:22 IST

वाशिम - भीमा कोरेगाव येथील दगडफेक घटनेचे पडसाद वाशिम जिल्ह्यातही उमटले असून, दुपारच्या सुमारास वाशिम शहरातून आंबेडकरी अनुयायांनी शांततामय मार्गाने मोर्चा काढला.

वाशिम - भीमा कोरेगाव येथील दगडफेक घटनेचे पडसाद वाशिम जिल्ह्यातही उमटले असून, दुपारच्या सुमारास वाशिम शहरातून आंबेडकरी अनुयायांनी शांततामय मार्गाने मोर्चा काढला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेला हा मोर्चा बसस्थानक, सिव्हिल लाईन मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला निवेदन देण्यात आले.भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात काही समाजकंटकांनी दगडफेक करीत भ्याड हल्ला केला. या घटनेचा निषेध म्हणून वाशिम शहरात आंबेडकरी अनुयायांसह सर्वच स्तरातील नागरिकांनी शांततामय मार्गाने मोर्चा काढून भीमा कोरेगाव येथील घटनेतील दोषींविरूद्ध कारवाईची मागणी केली. या घटनेचा निषेध म्हणून शहरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली. संबंधित घटनेतील समाजकंटकांवर त्वरीत कारवाई करावी, दोषींना अटक करून कठोर शिक्षा द्यावी अन्यथा साखळी उपोषण, बेमुदत उपोषण करण्याचा इशारा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात महामानवांच्या पुतळ्याला हारार्पण व अभिवादन केल्यानंतर हा मोर्चा बसस्थानक, सिव्हिल लाईन मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते मधुकरराव जुमडे, दौलतराव हिवराळे, अमोल खडसे, रवी पट्टेबहादूर, कैलास तेलगोटे, विशाल सावंत, गजानन खरात, संतोष इंगळे, सुनील कांबळे, सुमित कांबळे, अजय ढवळे, गजानन भोयर, आर.एस. दारोकार, राहुल बलखंडे, एन.आर. भोजने, अजय भालेराव, संतोष टोलमारे, जी.बी. गायकवाड, मोहन गायकवाड, हरिदास बनसोड, गजानन खरात यांच्यासह शेकडो समाजबांधव, विविध स्तरातील नागरिकांची उपस्थिती होती.

कनेरगाव येथे एस.टी.बसच्या काचा फोडल्या!

कनेरगाव नाका (वाशिम): पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील शौर्य स्तंभास अभिवादन करण्यादरम्यान उडालेला गोंधळ आणि त्यानंतर झालेल्या दगडफेकीचे पडसाद गतीने उमटत असल्याचे दिसून येत आहे. वाशिमपासून जवळच असलेल्या तथा हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव येथे सोमवारी सायंकाळी एका बसची काच फोडल्यानंतर मंगळवारी पुन्हा सकाळी आंदोलकांनी रस्त्यावर उतरून रास्तारोको आंदोलन, निदर्शने केली. यावेळी देखील तीन बसेस आणि एका खासगी वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावwashimवाशिम