लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा न्यायालय भरती प्रक्रियेत राज्यातील सुमारे ३ लाख उमेदवारांवर अन्याय झाल्याचे कारण समोर करून ही भरती प्रक्रिया स्थगित करावी, या प्रमुख मागणीसाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने रविवार, २४ जून रोजी येथे जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करून नंतर त्यांची सुटका केली.या आंदोलनाची सुरूवात वाशिममधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून करण्यात आली. यासंदर्भातील निवेदनात नमूद केले आहे, की जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया २०१८ मधील जाहिरातीप्रमाणे ८ हजार ९२१ जागा होत्या. त्यापैकी ८० ते ९० हजार उमेदवारांना परिक्षा देण्यास परवानगी देण्यात आली, परंतू ३ लाखांपेक्षा अधिक उमेदवारांना कुठलेही कारण न देता अपात्र ठरविण्यात आले. संविधान कलम १६ (४) (अ), १४ व २१ मधील मुलभुत अधिकारांचे उल्लंघन होत असल्यामुळे भरती प्रक्रियेवर स्थगिती यावी व अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, या मागण्यांसाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात एकाच दिवशी जेलभरो आंदोलन पुकारण्यात आले. वाशिममधील आंदोलनात जिल्हाध्यक्ष किशोर पडघाण यांच्यासह प्रमोद पट्टेबहादूर, धम्मपाल इंगोले, किशोर पडघाण, राजेंद्र गायकवाड, महेश खंडारे, प्रेमानंद अरखराव, पंकज पडघान, डॉ. रवी जाधव, मिलींद सुर्वे, नारायण पडघाण, सौरभ गायकवाड, वसंता अवचार, सुमित कांबळे, सुभाष इंगळे, जॉय अल्लाडा यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
भारतीय विद्यार्थी मोर्चाने केले जेलभरो आंदोलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 18:28 IST
वाशिम : जिल्हा न्यायालय भरती प्रक्रियेत राज्यातील सुमारे ३ लाख उमेदवारांवर अन्याय झाल्याचे कारण समोर करून ही भरती प्रक्रिया स्थगित करावी, या प्रमुख मागणीसाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने रविवार, २४ जून रोजी येथे जेलभरो आंदोलन करण्यात आले.
भारतीय विद्यार्थी मोर्चाने केले जेलभरो आंदोलन!
ठळक मुद्देया आंदोलनाची सुरूवात वाशिममधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून करण्यात आली. यावेळी पोलिसांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करून नंतर त्यांची सुटका केली.