वाशिम : केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने ८ डिसेंबर रोजी स्थानिक अकोला नाका येथे रास्ता-रोको आंदोलन करण्यात आले. कृषी प्रधान भारत देशात शेतकºयांना अन्याय होत असून, शेतीच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी सरकारने शेतकरी हिताचे निर्णय व कायदे करणे अपेक्षीत आहे. परंतू, केंद्र सरकारने नुकतेच कृषीचे कायदे केले असून, या कायद्यामुळे शेतकºयांना न्याय मिळणार नसल्याने उपरोक्त कायदे रद्द करण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आली. विविध शेतकरी संघटनांच्यावतीने ८ डिसेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात आली. या बंदला पाठिंबा देत वंचित बहुजन आघाडीच्यावतीने वाशिम येथे धरणे व चक्का जाम आंदोलन करण्यात आले. अकोला नाका येथे चक्का जाम केल्याने काही वेळ वाहतूक प्रभावित झाली होती. यावेळी चरण गोटे, सिद्धार्थ देवरे, मोहन महाराज, मिलिंद उके, किरणताई गिºहे, प्रा. आडे, संदीप सावळे, अकीलभाई, अनिल गरकळ, नागेश पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
Bharat Bandh : वाशिम येथे रास्ता-रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 18:21 IST