शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

सावधान, दुकानातून विकत घेतलेला मोबाईलही असू शकतो चोरीचा!

By सुनील काकडे | Updated: May 19, 2023 17:26 IST

वाशिम जिल्ह्यात उघडकीस आला प्रकार; आरोपीवर गुन्हा दाखल

वाशिम : अलिकडच्या काळात जिवनावश्यक झालेला मोबाईल हजारो रुपये देऊन विकत घ्यावा लागतो; मात्र तो मोबाईल चोरीचा देखील असू शकतो. चोरट्याकडून कमी किंमतीत मोबाईल घ्यायचा आणि तो बनावट बिलाव्दारे अधिक किंमतीत विकण्याचा गोरखधंदा सुरू आहे. वाशिमच्या सायबर पथकाने कारंजात असे प्रकरण उघडकीस आणले असून संबंधित मोबाईल विक्रेत्यावर गुन्हा दाखल झाला असून सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, कारंजा लाड येथील रहिवाशी दीपक मनवर यांचा मोबाईल हरविल्याची तक्रार त्यांनी काही दिवसांपूर्वी सीईआयआर पोर्टलवर दाखल केली होती. मोबाईलचा शोध घेत असताना तो कारंजा येथीलच रहिवाशी अल्ताफ युसूफ कालीवाले यांच्याकडे असल्याचे तपासात निष्पन्न झाले. कालीवाले यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी कारंजा येथील सोनू मोबाईल शॉपमधून मोबाईल विकत घेतल्याचे सांगितले. इतकेच नव्हे; तर मोबाईलचे बिलही सादर केले. त्यावरून संबंधित मोबाईल शॉपचालक चोरीचे मोबाईल बनावट बिल तयार करून ग्राहकांना विकत असल्याची बाब समोर आली. याप्रकरणी मोबाईल शॉप चालकावर कारंजा शहर पोलिस ठाण्यात भादंविचे कलम ४०३, ४६५, ४७१ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कार्यवाही सायबर सेलचे पो.नि. प्रशांत कावरे, स.पो.नि. संदिप नरसाळे, दीपक घुगे, कोमल गाडे यांनी केली.

दरम्यान, उघडकीस आलेल्या या प्रकरणामुळे अधिकृतरित्या मोबाईल शाॅपमधून विकत घेतला जाणारा नवा मोबाईलही चोरीचा असू शकतो, ही बाब अधोरेखीत झाली असून नागरिकांनी अशा भामटेगिरीला बळी न पडता सजग राहावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.सीईआयआर पोर्टलवर नोंदवा तक्रारकेंद्र शासनाच्या सीईआयआर वेबपोर्टलवर हरविलेल्या मोबाईलचा शोध घेणे सोयीचे झाले असून नागरिकांनी त्यांचा मोबाईल हरविल्यास किंवा चोरीला गेल्यास तत्काळ www.ceir.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तक्रार नोंदवावी.हस्तगत केलेले मोबाईल मूळ मालकांना केले परत‘सीईआयआर’ वेबपोर्टल’वर २०२२ मध्ये जिल्ह्यात ५०२ मोबाईल हरविल्याची तक्रार दाखल झाली. त्यापैकी १६५ मोबाईलचा शोध लावण्यात आला. यासह २०२३ मध्ये आतापर्यंत १७७ मोबाईल हरविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातील ४७ मोबाईल चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आले. या सर्व प्रकरणांमध्ये आरोपींवर कारवाई करण्यासह मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले.

  • दोन वर्षांत गहाळ झालेले मोबाईल - ६७९
  • ‘सीईआयआर’मुळे सापडलेले मोबाईल - २१२

सीईआयआर पोर्टलमुळे हरविलेल्या किंवा चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध घेणे सोपे झाले आहे. नागरिकांनी त्यांच्यासोबत घडलेल्या अशा घटनांची रितसर तक्रार संबंधित वेबपोर्टलवर तत्काळ नोंदवावी. तत्काळ तपास करून न्याय देण्यासाठी पोलिस प्रशासन कटिबद्ध आहे.- बच्चन सिंह,जिल्हा पोलिस अधीक्षक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमSmartphoneस्मार्टफोन