रिसोड (जि. वाशिम): जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय तसेच नगर परिषदेच्यावतीने रिसोड शहरात बेटी बचाओ बेटी पढाओ या बाबत मंगळवारी कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर परिषदेचे मुख्याधिकारी दिपक इंगोले तर प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसिलदार सुनिल सावंत, रिसोड आगार व्यवस्थापक स्वप्निल अहिरे, सहाय्यक व्यवस्थापक रवी मोरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय गवई, विजय रत्नपारखी, यांची उपस्थिती होती. यावेळी बसस्थानक परिसरात पोवाडयाच्या माध्यमातुन बेटी बचाओ बेटी पढाओ या बाबत जनजागृती करण्यात आली. शिरड शहापूर, येथील जयभवानी कला मंडळाने पथनाटय व गित गायनाव्दारे बेटी बचाओ बेटी पढाओ चा नारा दिला. स्त्री जन्माचे स्वागत करण्याचे आवाहन या जनजागृती मोहीमेच्या माध्यमातुन करण्यात आले. प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी सन्मानजनक प्रगती केली आहे, समाजात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया कामगिरी करीत आहेत. मात्र, पुरुषांच्या संख्येत स्त्रियांची संख्या कमी आहे. पुरुषांच्या बरोबरीत स्त्रियांची संख्या आणण्यासाठी प्रत्येकाने स्त्री जन्माचे स्वागत केले पाहिजे, असे उपस्थित मान्यवरांनी यावेळी सांगितले.
बेटी बचाओ, बेटी पढाओ बाबत जनजागृती
By admin | Updated: February 27, 2015 00:54 IST