शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात  ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियानाच्या नावाखाली नागरिकांची लुट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 14:19 IST

मालेगाव - केंद्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे राबविण्यात येणाºया ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या अभियानांतर्गत मुलींच्या उदरनिर्वाहासाठी अनुदान स्वरुपात कोणतीही योजना नसताना, मालेगावात तशी अफवा पसरविण्यात आली. परिणामी, या अभियानांतर्गत ग्राहक नोंदणी अर्ज भरण्यासाठी मालेगाव येथे नागरिकांची झुंबड उडाली आहे. 

ठळक मुद्दे मुलींच्या उदरनिर्वाहासाठी अनुदान स्वरुपात कोणतीही योजना नसताना, मालेगावात तशी अफवा पसरविण्यात आली.या अफवेवर विश्वास ठेवत अनेकांनी झेरॉक्स सेंटर गाठत अर्ज भरण्यासाठी एकच गर्दी केल्याचे दिसून येते.हा फॉर्म टपाल करण्यापर्यंत एका व्यक्तीला जवळपास शंभर रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे.

 

मालेगाव - केंद्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे राबविण्यात येणाºया ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या अभियानांतर्गत मुलींच्या उदरनिर्वाहासाठी अनुदान स्वरुपात कोणतीही योजना नसताना, मालेगावात तशी अफवा पसरविण्यात आली. परिणामी, या अभियानांतर्गत ग्राहक नोंदणी अर्ज भरण्यासाठी मालेगाव येथे नागरिकांची झुंबड उडाली आहे. 

स्त्री-पुरूष लिंगगुणोत्तरातील तफावत कमी करणे, मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जनजागृती करणे आदी उद्देशाने बेटी बचाओ- बेटी पढाओ अभियान वाशिम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मुलींच्या उदरनिर्वाहासाठी कोणतीही रक्कम देण्याची शासनाची योजना नाही. मात्र, मालेगाव शहरात या योजनेतून मुलींच्या उदरनिर्वाहासाठी शासनाकडून दोन लाख रुपये मिळणार असून, यासाठी अर्ज भरावे लागणार आहेत, अशी अफवा पसरविण्यात आली. या अफवेवर विश्वास ठेवत अनेकांनी झेरॉक्स सेंटर गाठत अर्ज भरण्यासाठी एकच गर्दी केल्याचे दिसून येते. या योजनेचा ग्राहक नोंदणी फॉर्म भरण्यासाठी  टपाल कार्यालयातदेखील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. शहरात बेटी बचाओ-बेटी पढओ या योजनेच्या नावावर शेकडो ‘फॉर्म’ची विक्री होत आहे. शहरासह ग्रामीण भागातून विद्यार्थिनी व महिलांनी पोस्ट कार्यालयाकडे फॉर्म पाठविण्यासाठी  धाव घेतली आहे. शहरातील अनेक झेरॉक्स सेंटरवर फॉर्म विक्री होत असून त्यासाठी लागणारे इतर कागदपत्रही  झेरॉक्स करून देण्यात येत आहेत. हा फॉर्म टपाल करण्यापर्यंत एका व्यक्तीला जवळपास शंभर रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. या फॉर्ममध्ये विविध माहिती मागण्यात आलेली असून त्यामध्ये अर्जदाराची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती तसेच बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक, शिक्षण घेत असल्याचे प्रमाणपत्र इत्यादी माहिती मागविण्यात आली आहे. फॉर्मसोबत असलेल्या पाकिटावर भारत सरकार, महिला एवं बालविकास मंत्रालय, शांतिभवन, नवी दिल्ली असा पत्ता प्रकाशित करण्यात आलेला आहे. नेमकी ही अफवा कुणी पसरविली, झेरॉक्स सेंटरवरून कुठून अर्ज आले, याची माहिती कुणाकडेही नाही. या अफवेमुळे सर्वसामान्य लाभार्थींची मात्र आर्थिक फसवणूक होत असून, मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे.कोट बॉक्स..

अशी कोणतीही योजना नाही. आणि आम्हाला अजुन वरिष्ठांकडून माहितीसुद्धा आलेली नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.-ए.टी.चौधरी,बाल विकास प्रकल्प अधिकारी, मालेगाव

टॅग्स :Washim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालयwashimवाशिम